कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?; रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड का टाकली?

| Updated on: Jan 09, 2024 | 1:28 PM

What is the Jogeshwari plot scam case : ज्या प्रकरणी रविंद्र वायकर यांच्यावर घरावर ईडीची धाड पडली तो जोगेश्वरी भूखंड घोटाळा नेमका काय आहे? रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड का टाकली? ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर आरोप काय आहेत? वाचा सविस्तर...

कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?; रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड का टाकली?
Follow us on

दिनेश दुखंडे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 09 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, मुंबईतील जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली आहे. आज सकाळी साडे 8 वाजेपासून रविंद्र वायकर यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी वायकर यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. ईडीच्या 12 अधिकाऱ्यांकडून वायकर यांच्या घरी चौकशी केली जात आहे. वायकर यांच्याकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीकडून कागदपत्रांची छाननी केली जात आहे. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊयात…

रविंद्र वायकर यांच्यावर आरोप काय?

मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा हात असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर 500 कोटींच्या 5 स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रिमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत 500 कोटींच्या घरात असल्याचादावा भाजप नेत्यांनी केला आहे.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे?

मुंबईतील जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात 13 हजार 674 चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या भूखंडाची किंमत 500 कोटींच्या घरात आहे. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी 5 स्टार हॉटेल बांधलं असल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे या बांधकामासाठी वायकर यांनी मुंबई महाापालिकेकडून परवानगी घेतली नव्हती, असा त्यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी रविंद्र वायकर यांची चौकशी सुरु आहे. चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली होती. मात्र वायकर या चौकशीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर आता ईडीकडून वायकर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे.