Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर शिंदे गटाचा पुढचं पाऊल काय? थेट मुंबई गाठणार, राज्यपालांना भेटणार

एकीकडे आम्हाला बोलावले जात आहे तर दुसरीकडे संजय राऊत आम्हाला दरडावत देत आहेत, जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातल्या निकालानंतर शिंदे गटाचा पुढचं पाऊल काय? थेट मुंबई गाठणार, राज्यपालांना भेटणार
एकनाथ शिंदे/भगतसिंग कोश्यारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 12:55 PM

मुंबई : शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आक्रमक झाले असून शिवसेना पक्षाविरूद्ध अधिकच सक्रिय झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारबरोबर राहायचे नाही, म्हणून त्यांनी बंड केले. त्यांच्यासोबत 38 आमदार (समर्थन) असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसे पत्र त्यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांना पाठवले आहे. या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे 39 तर एकूण 51 आमदार शिंदे गटाकडे आहेत. या सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. बंड केल्यापासून आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा ते करत आले आहेत. राज्यपालांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यपालांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

एकनाथ शिंदे यांनी उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्यांच्या याचिकेत याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रावर 34 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर आमच्याकडे बहुमत असून 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला आहे. विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना आज 5 वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. विधानसभेच्या नियमांनुसार सात दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु यात दोन दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटाने केली आहे. शिवाय

हे सुद्धा वाचा

याचिकेत शिवसेना, महाविकास आघाडीवर टीका

एकीकडे आम्हाला बोलावले जात आहे तर दुसरीकडे संजय राऊत आम्हाला दरडावत देत आहेत, जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी तरी ते मुंबईत येणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे. संजय राऊत यांनी अजूनही वेळ गेलेली नाही, परत या, असे आवाहन केले आहे. मात्र शिंदे गटाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. थोड्याच वेळात शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.