मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन (wine) विक्रीला परवानगी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यातील किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये दारू मिळताना दिसणार आहे. पण राज्य सरकारने फक्त वाईनलाच सुपर मार्केटमध्ये विक्रीला का परवानगी दिली? असा सवालही केला जात आहे. बियर आणि व्हिस्कीला परवानगी का दिली नाही? असंही विचारलं जात आहे. या पार्श्वभूमीवर वाईन, बियर आणि व्हिस्कीमधील फरक काय? असा सवालही केला जात आहे. वाईन, बियर (beer) आणि व्हिस्की (whiskey) या तिन्ही मद्य प्रकारात अल्कहोल असतं. पण त्याची मात्रा कमी अधिक असते. शिवाय प्रत्येक मद्य बनविण्याची पद्धतही वेगळी असते. काय असते ही पद्धत? वाईन, बियर आणि व्हिस्कीमधील फरकावर टाकलेला हा प्रकाश.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात हा निर्णय घेण्यात आला. सुपर मार्केटमध्ये किंवा वॉक इन स्टोअरमध्ये शेल्फ इन शॉप या पद्धतीने वाईनची विक्री ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते. त्यांच्या प्रोडक्ट्सला चालना देण्यासाठी ही परवानगी देण्यात आली आहे. सुपरमार्केटमध्ये एक स्टॉल म्हणजे एक शोकेस निर्माण करण्यात येणार आहे. तसा निर्णय झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
बियरमध्ये 3 ते 30 टक्के अल्कहोल असतं. मात्र लाईट बियरमध्ये चार आणि स्ट्राँग बियरमध्ये 8 टक्के अल्कहोल असतं. जर्मनीमधील बियर जगातील सर्वात चांगली बियर मानली जाते. मका, गहू आणि धान्याला काही प्रमाणात अंबवून घेतले जाते. त्यानतंर बियर बनविण्यात एक ते दोन आठवडे लागतात.
वाईन हा दारुचाच प्रकार आहे. वाईन बनविण्यासाठी फळांच्या रसांचा वापर केला जातो. खासकरून वाईन बनविण्यासाठी द्राक्षांचा वापर केला जातो. वाईनमध्ये 9 ते 18 टक्के वाईनचं प्रमाण असतं. फ्रान्समध्ये वाईनचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं. वाईनही बियरसारखीच बनवली जाते. साधारणपणे वाईनला रंगाच्या नावाने संबोधलं जातं. रेड वाईन किंवा व्हाईट वाईन या नावाने वाईनला संबोधलं जातं. मात्र द्राक्षांची क्वालिटी आणि त्याच्या प्रकारावर वाईनचं नाव ठरतं.
साधारणपणे लोक व्हिस्की अधिक घेतात. व्हिस्की तयार करण्यासाठी गहू आणि धान्याचा वापर केला जातो. व्हिस्की बनविण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. बियरपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्हिस्की तयार केली जाते. व्हिस्की बनवताना किंचित प्रमाणात धान्य अंबवून घेतलं जात नाही तर धान्य पूर्णपणे अंबवून घेतलं जातं. त्यानंतर व्हिस्की तयार केली जाते. व्हिस्कीत अल्कहोलचं प्रमाण अधिक असतं. यात अल्कहोलचं प्रमाण 30 ते 65 टक्के असते.
व्हिस्कीत सरासरी 43 टक्के अल्कहोल असतं. व्हिस्की दोन प्रकारची असते. एक म्हणजे माल्ट व्हिस्की आणि दुसरी ग्रेन व्हिस्की. माल्ट व्हिस्कीला मोड आलेल्या धान्यांपासून बनवले जाते. ही व्हिस्की चांगली आणि महागडी असते. तर ग्रेन व्हिस्की ही मोड न आलेल्या धान्यांपासून बनवली जाते. स्कॉटलंड व्हिस्कीचं उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. स्कॉटलंडमध्ये व्हिस्कीला स्कॉच म्हटलं जातं.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 January 2022https://t.co/6bM40Wyct1#NewsUpdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 27, 2022
संबंधित बातम्या:
Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा