टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : आकड्यांमध्ये कोणते पवार ‘पॉवरफुल’, काका की पुतणे? पाहा व्हिडीओ

राष्ट्रवादीत काका विरुद्ध पुतण्या या उभ्या फुटीनंतर आमदारही दोन गटात विभागले गेलेयत. आता नव्यानं शरद पवार गटातून कोणते नेते अजित पवार गटात गेले आहेत, या घडीला कोणता आमदार कुणाकडे आहे.

टीव्ही 9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट : आकड्यांमध्ये कोणते पवार 'पॉवरफुल', काका की पुतणे?  पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 11:55 PM

मुंबई : सध्या काका आणि पुतणे यांच्यापैकी संख्याबळात कोण पॉवरफुल आहे. कोणते ३ आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात आले आहेत., आणि सध्या राष्ट्रवादीचे किती आमदार तटस्थ आहेत. राष्ट्रवादीत काका विरुद्ध पुतण्या या उभ्या फुटीनंतर आमदारही दोन गटात विभागले गेलेयत. आता नव्यानं शरद पवार गटातून कोणते नेते अजित पवार गटात गेले आहेत, या घडीला कोणता आमदार कुणाकडे आहे.

अजित पवार गटाकडे खुद्द अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील,अनिल पाटील, नरहरी झिरवाळ, धर्मरावबाबा आत्राम, माणिकराव कोकाटे, निलेश लंके, अदिती तटकरे, संजय बनसोडे, दत्ता भरणे, प्रकाश सोळंके, सुनील शेळके, यशवंत माने, मनोहरचंद्रिकापुरे, दीपक चव्हाण, दिलीप बनकर, इंद्रनिल नाईक, बाळासाहेब आसबे, संग्राम जगताप, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, हसन मुश्रीफ, राजू कारेमोरे, बाबासाहेब पाटील, राजेश पाटील, शेखर निकम, नितीन पवार, बबन शिंदे, आशुतोष काळे , मकरंद पाटील आणि राजेंद्र शिंगणे असे 34 जण आहेत.

तर शरद पवारांकडे 13 जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश पोटे, अनिल देशमुख, सुनील भुसारा, मानसिंग नाईक अशोक पवार, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, चेतन तुपे आणि संदीप क्षीरसागर या १३ आमदारांचा समावेश आहे. ज्या आमदारांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही, यात सरोज अहिरे, चंद्रकांत नवघरे, दौलत दरोडा, अतुल बेनके आणि आमदार किरण लहामटे हे 5 आमदार आहेत.

पाहा व्हिडीओ-

यापैकी मकरंद पाटील आणि राजेंद्र शिंगणे हे आमदार काल-परवापर्यंत शरद पवारांच्या गटात होते. मात्र मतदारसंघाच्या विकासाचं कारण देत या लोकांनी अजित पवारांच्या गटात जाणं पसंत केलंय. गेल्या सरकारमध्ये मतदारसंघातल्या विकासकामांना स्थगिती मिळाली होती. मी त्याविरोधात कोर्टातही गेलो होतो., मात्र आता सत्तेत आल्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा होईल, असा दावा छगन भुजबळांनी केलाय.

सत्ताधाऱ्यांनी विकास करणं आणि विरोधकांनी त्यांच्या दबावानं तो घडवून आणणं, असं ढोबळमानानं लोकशाहीचं सूत्र आहे…मात्र मतदारसंघाचा विकास होत नाही याच मुद्द्यावरुन याआधी शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत एक सत्ता सोडून दुसऱ्या सत्तेत गेले त्यानंतर या घडीपर्यंत राष्ट्रवादीचे 34 आमदारही विकासाचं कारण देत विरोधात बसण्याऐवजी सत्ते बसले आहेत.

2019 च्या निवडणुकीत बहुसंख्य जनतेचं मतदान सार्थकी लागल्याचंही सोशल मीडियात बोललं जातंय. कारण ज्यांनी भाजपला मतदान दिलं, ते ३ वेळा सत्तेत आले. ज्यांनी राष्ट्रवादीला मतदान केलंय, ते सुद्धा 2 वेळा सत्तेत बसले. ज्यांनी शिवसेनेला मतदान दिलं, त्यांचेही दोन्ही गट मिळून दोन वेळा सत्तेत आले आणि ज्यांनी काँग्रेसला मतदान केलं, ते सुद्धा एक वेळा सत्तेत बसलेयत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.