कोणत्या राज्यात डॉग बाईट जास्त

कुत्रा भुंकायला लागला की भल्या भल्यांचा थरकाप नक्कीच उडतो. अनेक ठिकाणी कुत्रे घरी पाळलेले असतील तर तेथे पोस्टमन काका, कुरीयर बॉय फिरकतच नाहीत.

कोणत्या राज्यात डॉग बाईट जास्त
dogImage Credit source: dog
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 4:15 PM

मुंबई : कुत्रा (DOG) माणसाला चावला तर बातमी होत नाही, मात्र माणूस कुत्र्याला चावला तर मात्र बातमी नक्की होत असते, असे पत्रकारीतेत म्हटले जात असते, हे जरी खरे असले तरी संसदेत ( parliament) सादर झालेली श्वानदंश म्हणजेच कुत्र्याने माणसाचा चावा घेतल्याची आकडेवारी श्वानप्रेमीबरोबर सर्वसामान्यांच्या ह्रदयात धडकी भरविणारी नक्कीच आहे.

कुत्रा भुंकायला लागला की भल्या भल्याचा थरकाप नक्कीच उडतो. अनेक ठिकाणी कुत्रे घरी पाळलेले असतील तर तेथे पोस्टमन काका, कुरीयर बॉय फिरकतच नाहीत. कारण कुत्रा चावल्यावर डॉक्टर पोटामध्ये चौदा इंजेक्शन देतात असे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. त्यामुळे सर्वसामान्यांनी कुत्र्यांचा धसकाच घेतलेला असतो.

लोकसभेत शुक्रवारी सरकारने जाहीर केलेली श्वानदंशाची आकडेवारी घाबरवणारी आहे. आपण लिफ्टमध्ये कुत्र्यांनी लहान मुलांना चावल्याचे अनेक व्हीडीओ पाहिले असतील, त्यावर आपण चर्चा देखील केली असेल, मात्र कुत्रे पाळणाऱ्यांनी हे व्हीडिओ पाहून तरी आपल्या पाळीव प्राण्याचा त्रास सोसायटीतील इतरांना होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी असे संदेश हे व्हायरल व्हीडिओ पाहून घ्यायला हवा. कारण एकटे राहणाऱ्यांना तसेच अंध आणि वृद्ध व्यक्तींना कुत्र्या सारखा इमानदार प्राण्याची सोबत हवीच असते.

सन 2022 मध्ये कुत्र्याने माणसाला चावल्याच्या सर्वात जादा घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्रात 3,46,318 श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर तामिळनाडू (3,30,264 ), आंध्रप्रदेश ( 1,69,378 ),  उत्तराखंड ( 1,62,422 ), कर्नाटक (1,46,094), गुजरात (1,44,855 ) आणि बिहार (1,18,354 ) अशी कुत्र्याने माणसाला चावण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.