जंगलात फुले तोडताना तोल गेला, 50 फूट खोल दरीत पडला, नंतर सुरू झाला असा थरार
दोन जवान खोल दरीत दोरीच्या मदतीने उतरले आहेत. ते लहू यांना बाहेर काढण्यात कितपत यशस्वी होऊ शकतात, हे येणारी वेळचं ठरवेल.
मुंबई : चित्रपटाला शोभेशी थरारक घटना घाटकोपरच्या (Ghatkopar) भटवाडी हिल भागात घडली. लहू खोत हे जंगलात (Jungle) फूल तोडत होते. खाली खोल दरी असल्याचं त्यांच्या लक्षात आल नाही. त्यामुळं तोल जाऊन ते ५० फूट खोल दरीत कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून ते मध्यचं अडकले. ही बाब लक्षात येताच बाजूच्या नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना फोन केला. ते जवान घटनास्थळी पोहचले. खोल दरी पाहून त्यांनी दोरीचा वापर करून लहू यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. दोन जवान खोल दरीत दोरीच्या मदतीने उतरले आहेत. ते लहू यांना बाहेर काढण्यात कितपत यशस्वी होऊ शकतात, हे येणारी वेळचं ठरवेल. तोपर्यंत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यावे, अशी नागरिकांची प्रार्थना आहे.
दरीत अडकून पडले
घाटकोपरच्या भटवाडी हिलच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगर कपारीत एक व्यक्ती अडकून पडली आहे. लहू खोत असे या व्यक्तीचे नाव आहे.
लहू खोत हे भटवाडी हिल या डोंगराळ झोपडपट्टीमध्ये रहातात. या झोपडपट्टीच्या मागच्या बाजूला खोल दरी आहे. याच्या कोपऱ्यावर लहू खोत आले. त्यानंतर खाली तोल जाऊन पडले आणि मध्ये अडकले.
जवान सुटकेसाठी उतरले दरीत
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान दोरीच्या मदतीने डोंगराच्या कपारीत उतरले आहेत. सुमारे दोन तासापासून बातमी लिहेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं.
खाली सुमारे आणखी पन्नास फूट खोल आहे. सर्व भीतीदायक ऑपरेशन आहे. सध्या दोन जवान या ऑपरेशनसाठी उतरले आहेत.