उद्धव ठाकरे यांना हाताशी घेऊन कटकारस्थान कोण करतात?; रवी राणा यांचा या नेत्यावर गंभीर आरोप
अनिल परब यांनी महापालिकेची अनेक वर्षे दलाली केली. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम अनिल परब यांनी केल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला.
मुंबई : शिवसैनिक म्हाडाच्या ऑफिसमध्ये घुसले. सोमय्यांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून शिवसैनिक आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली. आंदोलन करणारे कोण आहेत. यावर बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, आंदोलन करणारे चेहरे माझ्या घरावर आंदोलन करण्यासाठी अनिल परब (Anil Parab) यांनी पाठविले होते. किरीट सोमय्यांना भेटायला गेलो असताना त्यांच्यावर हल्ला करणारे हेच ते आंदोलनकारी होते. तो हल्लासुद्धा अनिल परब यांच्या लोकांनीच केला. त्यावेळी सोमय्या यांची गाडी फोडण्यात आली. अशाप्रकारची कट-कारस्थानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हाताशी घेऊन अनिल परब करत असतात. असा आरोपही रवी राणा (Ravi Rana) यांनी केला.
रवी राणा म्हणाले, महापालिकेचे अधिकारी येतात. घराचे मोजमाप करतात. बिल्डिंगला एनओसी कुणी दिली. महापालिका ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडं होती. माझ्यासारख्या मराठी माणसानं याठिकाणी फ्लॅट घेतले. मुंबईत अशा हजारो बिल्डिंग आहेत. या बिल्डिंगला महापालिकेने एनओसी दिली.
यांनी अनेक वर्षे मनपाची दलाली केली
उद्धव ठाकरे यांच्या महापालिकेच्या संबंधित महापौरांनी त्यासाठी पैसे खाल्ले. अनिल परब यांनी महापालिकेची अनेक वर्षे दलाली केली. मराठी माणसांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम अनिल परब यांनी केल्याचा आरोपही रवी राणा यांनी केला.
मोजमापासाठी कधी ते मला बोलवा
अनिल परब यांना आव्हान देतो. आज तुमची सत्ता नाही. माझं घर मोजायला या. काय इल्लिगल आहे. ते माझ्यासमोर तोडा. नाहीतर उद्धव ठाकरे यांनी नवीन बिल्डिंग बांधली. त्या नवीन बिल्डिंगमध्ये ते शिफ्ट होणार आहेत. त्या बिल्डिंगमध्ये उद्धव ठाकरे यानी टीडीआर चोरला. एफएसआय वाढविला आहे. ते मोजमापासाठी मला कधी बोलवतात, ते सांगा.
यांनी भरली बिल्डरांची घरं
देवेंद्र फडणवीस हे म्हाडाचे मंत्री आहेत. फडणवीस यांनी हजारो गरिबांना घरं देण्याचं काम केलं. अनेक गरिबांना पक्के घरं दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत बिल्डर लोकांची घरं भरली, असा आरोपही रवी राणा यांनी केला.