Nana Patole | भाजपात असताना मोदींशी लढले आता थेट काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वोच्चपदी, कोण आहेत लढवय्ये नाना?

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी नाना पटोलेंची ओळख आहे. (Nana Patole Detail Information)

Nana Patole | भाजपात असताना मोदींशी लढले आता थेट काँग्रेसच्या राज्यातल्या सर्वोच्चपदी, कोण आहेत लढवय्ये नाना?
नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 5:49 PM

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. येत्या काही दिवसात नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी नाना पटोलेंची ओळख आहे. नाना पटोलेंची आता महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्वोच्चपदी निवड  होत आहे. (Who is Nana Patole Detail Information)

कोण आहेत नाना पटोले?

नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाना पटोलेंनी हल्लाबोल चढवला होता. 2017 मध्ये नाना पटोलेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले.

नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. पटोले आक्रमक असले तरी ही आक्रमकता योग्य ठिकाणी वापरु, अशी प्रतिक्रिया त्यांनी उमेदवारीच्या घोषणेनंतर दिली होती.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याआधी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती झाली होती.

नाना पटोले यांचा राजीनामा 

नाना पटोले आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा अध्यक्ष, काँग्रेसचाच होणार की शिवसेनेचा? याबाबतही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Who is Nana Patole Detail  Information)

संबंधित बातम्या : 

BREAKING | नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.