Sanjay Raut: महाराष्ट्रातील नवे हिंदू ओवैसी कोण? हे भोंग्यावरूनच स्पष्ट; राऊतांचा राज ठाकरेंवर नाव न घेता हल्ला
Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भोंग्यांच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात शांतता आहे. पण काल महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भोंग्यांच्या मुद्दयावरून पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात शांतता आहे. पण काल महाराष्ट्रात शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस शांत आणि संयमी आहेत. आम्ही तणावाचं वातावरण होऊ दिलं नाही. यापुढे होऊ देणार नाही. राम आणि हनुमानाच्या (hanuman) नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी ते करत आहेत. महाराष्ट्रातील ओवैसी कोण आहेत हजार भोंग्यावरून स्पष्ट झालं आहे. याविषयावर निवेदन दिलं जाऊ शकलं असतं, चर्चा केली असती. पण भाजपच्या मनातील राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी भोंग्याचं वातावरण सुरू होतं. कालच्या निकालाने त्याला थारा दिला नाही. उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपने ओवैसीला पुढे केलं. तेच काम भाजप महाराष्ट्रात नव हिंदू ओवैसीकडून करून घेत आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. राज्यातील वातावरण दंगल सदृश्य करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी तो उधळून लावला. महाराष्ट्रातील जनता असे षडयंत्र उधळून लावेल. महाराष्ट्रातील एकतेला, धार्मिकतेला चूड लावण्याचा प्रयत्न करू नये, असंही राऊत म्हणाले.
दिल्लीतील हल्ले प्रायोजित
देशाची हालत आणि वातावरण राजकीय फायद्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी खराब केला जात आहे. ते देशासाठी योग्य नाही. काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. शांततेत उत्सव साजरे केले जात होते. मिरवणूक काढण्याचा हक्क सर्वांना आहे. पण दिल्लीतील हल्ले प्रायोजित आहेत. राजकीय स्पॉन्सर्ड हल्ले आहेत. हिंदू-मुस्लिम दंगे व्हावेत यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. निवडणुका आहेत. त्यामुळे भारत-पाक चालणार नाही, आयोध्या चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक चालणार नाही, त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच देशातील काही शक्तींनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आहे, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे