भाजपभक्तांचे शिरोमणी कोण, सुषमा अंधारे यांनी सांगितलं
गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःवर उपचार करून घ्यावेत, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी केली.
उस्मानाबाद – गुणरत्न सदावर्ते यांच्या मागणीवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. गुणरत्न सदावर्ते हे भाजपचे शिरोमणी आहेत, असा आऱोप केला आहे. प्रत्येक कामाच्या वेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीचा मनुवादी चेहरा दिसत असल्याचंही त्या म्हणाल्या. भाजपची नीती ही फोडा आणि राजकारण करा अशी आहे. त्यामुळं भाजपविरोधी शब्द भाजपभक्त ऐकूणचं घेऊ शकत नाही. सदावर्ते या भक्तांचे शिरोमणी आहेत. त्यांना मी शुभेच्छा देते. पुढंही आरएसएस त्यांचं पुनर्वसन करेल, अशी अपेक्षा व्यक्त करते, अशी टीका सुषमा अंधारे यांनी सदावर्ते यांच्यावर केली.
तर गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःवर उपचार करून घ्यावेत, अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी केली. ज्यांनी सदावर्ते यांचा विरोध केला. त्या सर्वांच मी अभिनंदन करतो. तरुणांचे माथे भडकविण्याचं काम सदावर्ते याठिकाणी करताहेत.
सदावर्ते यांना महत्त्व देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. तरीही त्यांना एक सल्ला मी देऊ इच्छितो. त्यांनी स्वतःचा उपचार करावा, असंही विनोद पाटील म्हणाले. शक्य असेल तर पुणा येथील येरवाडा येथे करावा. उपचारादरम्यान त्यांना वाटलं तर स्वतंत्र राष्ट्राचीदेखील मागणी करावी, असंही विनोद पाटील म्हणाले.
सदावर्ते यांनी उस्मानाबादमध्ये स्वतंत्र विदर्भ आणि मराठवड्यासाठी मागणी केली. सदावर्ते यांनी संवाद परिषदेचं आयोजन केलं होतं. पण, संवाद परिषद सुरू होत असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत सदावर्ते यांचा निषेध केला.
सदावर्ते यांनी आधी मराठा आरक्षणाला विरोध केला. आता मराठवाड्याचा मागणी करत महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप मराठा समाजानं केला. मराठा आंदोलनकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.