मुंबई : धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे. धुळ्यात भाजपने विजय मिळवला आहे, तर अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील 27 महानगरपालिकांमधील 15 महापालिकांमध्ये एकट्या भाजपची एकहाती सत्ता आहे. तर कल्याण-डोंबिवली आणि औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या मदतीने भाजप सत्तेत आहे.
राज्यातील 27 महापालिकांमध्ये कुणाची सत्ता?
- मुंबई महापालिका – शिवसेना
- नवी मुंबई महापालिका – राष्ट्रवादी
- पनवेल महापालिका – भाजप
- ठाणे महापालिका – शिवसेना
- कल्याण-डोंबिवली महापालिका – शिवसेना-भाजप
- उल्हासनगर महापालिका – भाजप
- भिवंडी-निजामपूर महापालिका – काँग्रेस
- मीरा भाईंदर महापालिका – भाजप
- वसई-विरार महापालिका – बहुजन विकास आघाडी
- पुणे महापालिका – भाजप
- पिंपरी चिंचवड महापालिका – भाजप
- नाशिक महापालिका – भाजप
- धुळे महापालिका -भाजप
- मालेगाव महापालिका – काँग्रेस
- जळगाव महापालिका – भाजप
- औरंगाबाद महापालिका – शिवसेना-भाजप
- परभणी महापालिका – काँग्रेस
- लातूर महापालिका – भाजप
- नांदेड-वाघाळा महापालिका – काँग्रेस
- नागपूर महापालिका – भाजप
- अकोला महापालिका – भाजप
- चंद्रपूर महापालिका – भाजप
- अमरावती महापालिका – भाजप
- सोलापूर महापालिका – भाजप
- अहमदनगर महापालिका – त्रिशंकू स्थिती
- कोल्हापूर महापालिका – काँग्रेस-राष्ट्रवादी
- सांगली-कुपवाड महापालिका – भाजप