हाथरस प्रकरणावेळी भाजपचे नेते गप्प का होते; यशोमती ठाकुरांचा पलटवार
ही घटना निंदनीय आहे आणि याचं राजकारण केलं जातं आहे. | yashomati thakur

मुंबई: जळगाव वसतीगृहातील मुद्द्यावर आवाज उठवणारे भाजपचे नेते उत्तर प्रदेशात हाथरस बलात्कार प्रकरण घडले तेव्हा कुठे गेले होते, असा सवाल राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. (Congress leader Yashomati Thakur slams BJP leaders)
जळगाव प्रकरणी गृहमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेच आहेत. पण मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालणार आहे. गृह विभाग चौकशी करलेच पण महिला बालकल्याण विभागाकडून देखील चौकशी केली जाईल. ही घटना निंदनीय आहे आणि याचं राजकारण केलं जातं आहे. महिला ही महिला असते, ती काही कोणत्या पक्षाची नसते. पण उतरप्रदेशच्या हाथरस येथे असे प्रकरण घडले तेव्हा भाजप नेते गप्प होते, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय’
जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.
I haven’t seen the video. If you have a copy of that, please let me see. But I assure you that nobody will be spared, strict action will be taken. Home Minister has ordered a probe & I’m personally looking into it too: Yashomati Thakur, Maharashtra Women & Child Development Min pic.twitter.com/c3qI7JTrHE
— ANI (@ANI) March 3, 2021
मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.
जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृह गाठून महिला आणि मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता एक मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरील पुरुषांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार समोर आला.
संबंधित बातम्या:
पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचायला लावलं, महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार
(Congress leader Yashomati Thakur slams BJP leaders)