VIDEO: मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले हरवलेत, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, वायकर का बोलत नाहीत?, राऊतच का बोलतात?; सोमय्यांचा सवाल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही.
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच (sanjay raut) या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल करतानाच मला चप्पलेने मारणार ते ठिक आहे. पण हरवलेल्या 19 बंगल्यावर बोला. त्याचे उत्तर द्या, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसेच राऊत यांनी केलेले सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधातील कागदपत्रे असतील तर त्यांनी ती मीडियाला द्यावीत, असं आव्हानही त्यांनी राऊत यांना दिलं.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं. माफीया सेनेनं जे लुटलंय, त्याची रक्षा करणं माझं काम आहे. माझं मराठी काही इतकं उत्कृष्ट नाही. हजारो कोविड पेशंटचा बळी घेणाऱ्यांवर ठाकरे का बोलत नाही? कोविड घोटाळ्याच्या माझ्या प्रश्नांना का उत्तर देत नाहीत? 19 बंगल्याचे पुरावे देणार असल्याचं मी सांगितलं होतं. रश्मी वहिनींचं त्यात नाव आहे म्हणून आम्ही पुढं जाणार नाही. 19 बंगले त्यांनी कशाला मध्ये आणले. त्यामुळे मला सगळे डॉक्युमेन्ट द्यावे लागलेत, असं सोमय्या म्हणाले.
उद्या अलिबागला जाऊन तक्रार करणार
जानेवारी 2019 मध्ये माझ्या नावानं बंगले करा, असं रश्मी ठाकरेंचं पत्र आहे. मी बंगले दाखवणार नाही. तुम्हीच कागदपत्रांच्या आधारे त्या ठिकाणी बंगले असल्याचं सिद्ध केलं आहे. मी जाऊन तिथे बंगले शोधले. पण मला बंगले सापडले नाहीत. आता मुख्यमंत्र्यांचे 19 बंगले हरवलेत, यावर रश्मी ठाकरे, वायकर हे सगळे बोलतील. राऊत का बोलत आहेत?, असा सवाल त्यांनी केला. उद्या अलिबागला जाणार, बंगले नसतील, तर पोलिस स्थानकात तक्रार करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कागदपत्रं दाखवा, मग बोलू
मीडियाची एक क्रेडिबिलीटी आहे. राऊतांनी गेल्या काही दिवसांत अनेक आरोप केले. त्यांनी डॉक्युमेन्ट द्यावीत. हे काय मनोरंजन चाललंय का? टीव्हीवर स्टंट करायचा. इश्यू डायव्हर्ट करायचा प्रयत्न सुरू आहे. ज्यांना ज्यांना जे जे सांगयाचं ते सांगावं. तुम्ही करा चौकशी. मी अपिल पण नाही करणार. पण मीडिया राऊतांना पत्र का विचारत नाही. कागदपत्र दाखवा, मग बोलू, असं ते म्हणाले.
तुलना करू नका
किरीट आणि राऊतांची तुलना नका करू. डॉक्युमेन्ट घेऊन बोला, भाजपने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्युमेन्ट नसताना त्यांनी आरोप केले. आता तुम्हीच त्यांना विचारा ना. सेंट्रल एजन्सीने कोट्यवधी रुपये घेतले असं म्हणता ना. द्या ना पुरवा. सोमय्याने आयुष्यात एक दमडीचा भ्रष्टाचार केला नाही, असं त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
चंद्रकांतदादा सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील; राऊतांचा सल्ला
राऊत आमच्या कुटुंबाचा भाग, पण आमच्यात कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत; सुजित पाटकर EXCLUSIVE