फार मोठ्या नटसम्राटाला आपण मुकलोय, छगन भुजबळांबाबत अजित पवार असं का म्हणालेत?

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली, हेही अजित पवारांनी सांगितलं.

फार मोठ्या नटसम्राटाला आपण मुकलोय, छगन भुजबळांबाबत अजित पवार असं का म्हणालेत?
छगन भुजबळांवर अजित पवारांचं भाष्य नेमकं काय?Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 7:19 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा अमृतमहोत्सवी सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ यांनी राजकारण, समाजकारण केलं. क्रीडा, नाटक, चित्रपट, अभिनय अशा अनेक गोष्टीत ते रमतात. जीवनाचा मनापासून आनंद घेणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. चित्रपटात काम केलं. फार मोठ्या नटसम्राटाला महाराष्ट्र मुकला. नाहीतर बाकीच्यांचं काही खरं नव्हतं. असंही अजित पवार म्हणाले. 1985 दैवत, 1990 मध्ये नवरा बायको या दोन चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली, याची आठवण पवारांनी छगन भुजबळांच्या बाबतीत करून दिली.

अजित पवार म्हणाले, 1986 मध्ये बेळगावमध्ये छगन भुजबळ घुसले होते. मराठी माणसाचा आवाज सीमाभागात काम करत राहिले. राष्ट्रपती भवनानंतर महाराष्ट्र भवन अतिशय चांगला आहे. त्यातही भुजबळांचा मोठा वाटा आहे.

गेलेलं सरकार भुजबळ यांनी आणलं. ठोसास ठोसा कसा द्यायचा याचं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. नुसत राजकारण केलं नाही. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली, हेही अजित पवारांनी सांगितलं. पण, सध्या राज्याची राजकीय संस्कृती लोप पावत चालली आहे, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

लढाऊ वृत्ती. संकटावर मात करून बचेंगे तो और भी लढेंगे अशी त्यांची ओळख आहे. अनेक अडचणी आल्या. बाळासाहेब ठाकरे नाराज होते. पण, नंतर त्यांची नाराजी दूर झाली. बाळासाहेबांच्या बद्दल असलेला आदर दिसतो.

भुजबळ साहेबांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. जीव ओतून काम करायचं. राष्ट्रवादीत अनेक जबाबदाऱ्यांवर काम केलं. स्वतंत्र अमिट ठसा उमटवला. तत्पूर्वी शिवसेनेच्या स्थापनेत त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. आघात घडले. पण,ते डगमगले नाहीत, अशी छगन भुजबळ यांची महिमा अजित पवार यांनी यावेळी गायिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.