गोंद पॅकेट किंवा बाटलीच्या आत का चिकटत नाही? जाणून घ्या याचे कारण
पांढर्या रंगात येणाऱ्या गोंदमध्ये पाणीही असते. हे पाणी एक प्रकारे सॉल्वेंटचे कार्य करते. पाण्यामुळे जोपर्यंत आपण हे गोंद कुठे पेस्ट करत नाही तोपर्यंत हा गोंद द्रव स्वरूपात असतो. (Why doesn't the glue stick inside the packet or bottle, know the reason)

मुंबई : आपण एखादी वस्तू चिकटविण्यासाठी गोंद वापर करतो. परंतु आपण कधी विचार केलाय, प्रत्येक वस्तू चिकटवणारा गोंद बाटलीच्या आत का चिकटत नाही? गोंदमध्ये काय असते, जे बाटलीतून काढल्यानंतर वस्तूंना चिकटते, परंतु बाटलीमध्ये चिकटत नाही? ही जादू नसून विज्ञान आहे. बहुतेक लोक जो सफेद गोंद वापरतात तो विविध प्रकारच्या रसायनांद्वारे तयार केला जातो. या रसायनांना पॉलिमर म्हणतात. हे पॉलिमर लांब आणि चिकट स्ट्रॅन्ड आहेत. गोंद बनवणाऱ्या कंपन्या चांगला गोंद तयार करण्यासाठी अशा चिकट स्टँडच्या योग्य कॉम्बिनेशनचा वापर करतात. हे पॉलिमर लवचिक देखील असतात. पांढर्या रंगात येणाऱ्या गोंदमध्ये पाणीही असते. हे पाणी एक प्रकारे सॉल्वेंटचे कार्य करते. पाण्यामुळे जोपर्यंत आपण हे गोंद कुठे पेस्ट करत नाही तोपर्यंत हा गोंद द्रव स्वरूपात असतो. (Why doesn’t the glue stick inside the packet or bottle, know the reason)
गोंदच्या मदतीने एखादी वस्तू कशी चिकटते?
जेव्हा आपण कागदावर गोंद ठेवता तेव्हा त्यातील पाण्याचे हवेमध्ये बाष्पीभवन होते. पाण्याचे बाष्पीभवन होताच गोंद सुकतो आणि कडक होतो. केवळ चिकट आणि लवचिक पॉलिमर गोंदमध्ये उरते. अशा प्रकारे आपण गोंदच्या मदतीने काहीही चिकटवू शकता. विज्ञानामध्ये याला मेकॅनिकल अढेशन(Mechanical Adhesion) देखील म्हणतात.
गोंद त्याच्या पॅकमध्ये का चिकटत नाही?
जेव्हा हा गोंद बाटली / पॅकच्या आत असतो तेव्हा गोंदमधील पाण्याचे बाष्वीभवन व्हायला त्यात हवा नसते. आपण असेही म्हणू शकता की या पॅकिंगच्या सहाय्याने गोंदमध्ये असलेले पाणी सुकण्यापासून वाचवले जाते. जर आपण गोंदचे झाकण काही काळ बंद केले नाही, तर ते कोरडे होऊ लागते. जर बराच वेळ बॉटल उघडी ठेवली तर संपूर्ण गोंद सुकते.
सुपर गोंद काय असते?
जेव्हा आपल्याला तात्काळ काही पेस्ट करायचे असेल, तर यासाठी सुपर गोंद वापरले जाते. सुपर गोंद एका विशिष्ट प्रकारच्या रसायनापासून तयार केला जातो, ज्याला सायनोआक्रिलेट(Cyanoacrylate) म्हणतात. जेव्हा हे रसायन हवेतील विद्यमान पाण्याच्या कणांच्या संपर्कात येते तेव्हा एक प्रकारची रासायनिक प्रतिक्रिया येते. या प्रतिक्रियेमुळे एक बॉण्ड तयार होतो, ज्यामुळे आपण काहीतरी चिटकवता. या प्रक्रियेस केमिकल अढेशन (Chemical Adhesion) म्हणतात. (Why doesn’t the glue stick inside the packet or bottle, know the reason)
तौक्ते चक्रीवादळात पावसाचा सांगावा घेऊन आफ्रिकेतून चातक पक्षी थेट सांगलीच्या कृष्णाकाठावर#AlertInKonkan #ArabianSeaCycloneTauktae #CycloneTauktae #CycloneTauktaeIMDhttps://t.co/gZaqCe0Gut
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
इतर बातम्या
Coriander | मधुमेह नियंत्रित करेल, हिमोग्लोबिन वाढवेल, वाचा ‘कोथिंबीर’ खाण्याचे महत्त्वपूर्ण फायदे