तेव्हा पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी

तुमच्या 'ईडी'च्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. | Nawab Malik

तेव्हा पवारांना पाठवलेली नोटीस मागे का घेतली?: राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 10:20 AM

मुंबई: महाराष्ट्रासाठी ईडीचा (ED) खेळ हा नवा नाही. भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जाते. या माध्यमातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला. (NCP leader Nawab Malik takes a dig at BJP over ED notice to Sanjay Raut’s wife)

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी सोमवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय? यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ही नोटीस मागे का घेतली, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला. तसेच सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपला सत्ता मिळेत, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असेही मलिक यांनी म्हटले.

प्रत्येक राज्यावर भाजप सरकारकडून दबाव आणण्याचा प्रयत्न

भाजपकडून प्रत्येक राज्यात दबावतंत्र वापरले जात आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना पैसे दिले जात नाहीत. राज्यातील प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले जातात. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’सोबत काय झाले ते पाहा. बिहारच्या निवडणुकांसाठी सुशांत सिंहच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात आलं. भाजपने त्यासाठी सीबीआयचा कशाप्रकारे वापर केला, हे देशाला माहिती असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.

‘प्रकाश आवाडे आणि फडणवीसांच्या भेटीत राजकारण नाही’

कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन आमदरांची भेट घेतली. मात्र, ही भेट वैयक्तिक संबंधातून झाली. त्यामध्ये कोणतंही बेरजेचं राजकारण आहे, असं वाटत नसल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

तुम्ही चार द्या, पण दोन घ्यायची तयारी ठेवायलाच हवी: राऊत

राजकारणात दोन घ्यावे आणि दोन द्यावेत. भाजपची ताकद मोठी असल्याने तुम्ही चार द्यावेत. पण कधीतरी दोन घ्यावेच लागतील आणि सत्ताधाऱ्यांनी याची तयारी ठेवायलाच हवी, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

मोदी सरकारचे भाग्य असेल की, आज विधी बाकांवर मधु लिमये, मधु दंडवते, लोहिया, जनेश्वर मिश्र नाहीत. चंद्रशेखर, इतकेच काय लालू यादव, येचुरीदेखील नाहीत. नाहीतर टोले आणि टोमणे म्हणजे काय याचा प्रत्यय आलाच असता. राज्य मिळाले आहे ते नीट चालवा शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते, अशा शब्दांत सामनातील अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला.

(NCP leader Nawab Malik takes a dig at BJP over ED notice to Sanjay Raut’s wife)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.