‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, मुंबईतल्या गणेश मंडळांचा पवित्रा, शासनाकडून सहकार्याची अपेक्षा
'सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू', असा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. तसा पत्रव्यवहार गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी सुरु केला आहे. | mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government
मुंबई : ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा यंदाच्या वर्षी मुंबईतील गणेश मंडळांनी घेतला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. मोठ्या गणेश मुर्ती न आणता छोट्या गणेश मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र आता कोरोनातून राज्य सावरु लागलं आहे. अशावेळी आम्ही ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा पवित्रा मुंबईतील गणेश मंडळांनी घेतली आहे. तसंच त्यांनी शासकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. (Will follow all the rules, but lets bring ganesh murti high, mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government)
कोरोनावर गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीवर परिणाम
कोरोनाने समाजाच्या सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम केलाय. कला, क्रीडा, राजकारण, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रांमध्ये कोरोनामुळे स्थित्यांतरं पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातला प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव… कोरोनाकाळात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले. सरकारने नियमावली आखून दिली. थाटामाटात उत्सव साजरा करण्याऐवजी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची अनुमती दिली. यातच मोठ्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्याऐवजी छोट्या मुर्ती बसवाव्यात, असा आग्रह धरण्यात आला.
‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’
मात्र राज्य आता हळूहळू कोरोनातून सावरत आहे. विविध शहरांमधला कोरोना संसर्गाचा दर खाली येतोय. तिसऱ्या लाटेची भीती आहेच. पण अशा काळात शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करु. म्हणूनच ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’, असा निर्धार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी केला आहे. तसा पत्रव्यवहार गणेश मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी सुरु केला आहे.
गणेश मंडळांची भूमिका काय?
मुंबईची ओळख असलेल्या उंच गणेशमूर्तींच्या प्रघातात करोनामुळे खंड पडला. परंतु यंदाच्या वर्षी ‘सर्व निर्बंध पाळू, मूर्ती मात्र उंचच आणू’ असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे. सरकारी नियमावलीला दिरंगाई होत असल्याने मंडळांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय नेत्यांशी मूर्तीच्या उंचीबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. गेल्या वर्षी आम्ही नियमांची अंमलबजावणी केली. अनेक ठिकाणी उत्सवात खंड पडला. पण यंदा मात्र सरकारने मंडळांची भूमिका समजून घ्यावी,’ असे मंडळांचे म्हणणे आहे.
(Will follow all the rules, but lets bring ganesh murti high, mumbai Ganesh Mandals expect cooperation from the government)
हे ही वाचा :