काँग्रेसविरोधात कोण वापरणार ‘संजयास्त्र’; निरुपम आज करणार मोठी घोषणा
Sanjay Nirupam : 'हमने दिल का हाल क्या बया किया, उन्होने तो हमे बेवफा करार दिया' संजय निरुपम यांची काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास केलेले संजय निरुपम यांना काँग्रेसची संस्कृती रुचली नाही आणि रुजली पण नाही. आज ते कोणत्या नवीन राजकीय वळणावर तंबू ठोकतात, ते लवकरच कळेल.
राज्यातील माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी रात्री काँग्रेसने हकालपट्टी केली. सहा वर्षांकरीता त्यांच्यासाठी पक्षाने दार बंद केली आहेत. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाविषयी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. पक्षविरोधातील वक्तव्य आणि पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. . शिवसेना आणि काँग्रेस अशी त्यांनी राजकीय कारकीर्द गाजवली आहे. ते मुंबईतील एक आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात. वायव्य मुंबई मतदारसंघातील घडामोडींवरुन ते नाराज असल्याचे समोर आले होते. आता ते कोणत्या राजकीय वळणावर तंबू ठोकतात, याची उत्सुकता आहे.
सहा वर्षांकरीता निलंबित
महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे गटाविरोधात त्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोर्चा वळवला होता. वायव्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. पण ही आशा धूसर झाल्यानंतर त्यांच्या शब्दांना धार आली. तर एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली होती. त्यांच्याविरोधातील तक्रारीची दखल घेत, काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी त्यांना सहा वर्षांकरीता पक्षातून निलंबित केले. त्यांचे नाव स्टार प्रचाराकातून हटविण्यात आले.
आता काय घेणार निर्णय
त्यांचे नाव पक्षाच्या स्टार प्रचाराकातून हटविण्यात आल्यानंतर संजय निरुपम यांनी सोशल मीडियावर भावनांना वाट मोकळी करुन दिली. पक्षाने आता माझ्यावर आणि माझ्या कार्यालयीने खर्चावर अधिक ऊर्जा आणि पैसा खर्च करु नये, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. पक्षाने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आपण गुरुवारी निर्णय जाहीर करु असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार उशीरा रात्री त्यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला. आता ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटात जाणार?
संजय निरुपम हे शिदे गटात जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अर्थात याविषयीची अधिकृत भूमिका त्यांनी अजून जाहीर केलेली नाही. सध्या वायव्य मुंबई ह मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. निरुपम या मतदारसंघासाठी उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. संजय शिरसाट यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. निरुपम हे पक्षात आल्यास त्यांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले तर उमेदवारीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणीवस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संजय निरुपम यांचा दारुगोळा महाविकास आघाडीच्या विरोधात कसा वापरण्यात येईल, हे लवकरच स्पष्ट होईल.