विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार? पीयूष गोयल यांची मोठी भविष्यवाणी

Uddhav Thackeray-BJP Alliance : राज्यात प्रचाराचा नारळ फुटला आहे. रॅली, सभांना जनतेचा प्रतिसाद असला तरी या निवडणुकीत कुणाची खिचडी शिजणार हे ठामपणे कोणाला ही सांगता येत नाही. निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलू शकतात, असे संकेत काही नेते देत आहेत. तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजप मनधरणीसाठी 'मातोश्री'वर जाणार? पीयूष गोयल यांची मोठी भविष्यवाणी
उद्धव सेना-भाजप एकत्र येणार?
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 9:18 AM

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फुटला आहे. राजकीय वातावरण तापले आहे. प्रचाराचा धडाका सुरू आहे. यंदा राजकारणाची अभूतपूर्व खिचडी झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशाच खिचडीतून तयार झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे. तर भाजप नेते पीयूष गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी असल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले पीयूष गोयल?

बिझनेस टुडे यांनी एका कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरु असल्याबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, त्यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगितले. “मी स्पष्ट करतो की, पडद्यामागून कुठलीही चर्चा, संवाद, संपर्क करण्यात आलेला नाही. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत अजून मजबुतीने उभे आहोत. त्या शिवसेना गटासोबत आमचा काही एक संबंध नाही.” अशी प्रतिक्रिया गोयल यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजप यांचा मिळून एक मजबूत युती तयार झाली आहे. आमचे महायुतीचे सरकार राज्यात बहुमताने निवडून येईल आणि हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत विकसीत राष्ट्र करण्याच्या संकल्पात सहभागी आहे, यावर त्यांनी जोर दिला.

लोकसभेत कमी मतांनी पराभव

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूकीनंतर लागलीच होत आहेत. लोकसभेत विरोधी आघाडीने महायुतीला झटका दिला होता. त्यावर पीयूष गोयल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीबाबत मी मोठा आशावादी आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही काही जागांवर अगदी कमी मतांनी हारलो. काही ठिकाणी महाविकास आघाडीने चांगले प्रदर्शन केले असले तरी विजयी आणि पराभव झालेल्या उमेदवारात मतांचा मोठा फरक नसल्याचे दिसून आले. 11 जागांवर तरी असेच चित्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.