मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची युती होणार काय?; महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मातोश्रीवर महत्त्वाची बैठक
महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्या त्या पक्षानं सामावून घ्यावं. जस राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सोबत येणाऱ्या घटकपक्षांना सामावून घ्यावं. शिवसेनेनं वंचितसोबत युती केली तर त्यांनी त्यांच्या पक्षात सामावून घ्यावं.
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज संध्याकाळी मातोश्रीवर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटणार आहेत. अजित पवार संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत. ठाकरे गटाच्या मित्रपक्षांना त्यांनी सांभाळून घ्यावं, अशी इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली. तसेच बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. सहा महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली बदलली असल्याचं पवार म्हणाले. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे, हे निर्विवाद सत्य आहे. या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडीत असताना मुंबईत बरोबर काम करण्याबाबत सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता.
गेल्या सहा महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता वंचित बहुजन विकास आघाडीसोबत शिवसेनेचे संबंध जुळले. त्यांची युती कशी पुढं जाईल हे पाहायला मिळेल.
पण, उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो होतो की, महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्या त्या पक्षानं सामावून घ्यावं. जस राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या सोबत येणाऱ्या घटकपक्षांना सामावून घ्यावं. शिवसेनेनं वंचितसोबत युती केली तर त्यांनी त्यांच्या पक्षात सामावून घ्यावं. काँग्रेसनं त्यांच्या मित्रपक्षांना सांभाळून घ्यावं. हे महापालिकेच्या संदर्भातील नव्हतं. हे लोकसभा आणि विधानसभेच्या संदर्भात होतं.
आम्ही त्यांच्याशीही चर्चा करू
काँग्रेसबद्दल मी बोलू शकत नाही. पण, मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत जाण्याची आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पक्ष आणि संघटना म्हणून काँग्रेस मोठा आहे. त्यामुळं त्यांच्याशी आम्ही चर्चा करू.
राज्यपाल यांना ज्यांनी पाठविलं त्यांनी त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा. वरिष्ठांना कोणता निर्णय घ्यायचा हा वरिष्ठ घेतात. सर्वच राजकीय पक्षांमध्ये अशीच परिस्थिती असते.
जुन्या राजकीय गोष्टींना काही अर्थ नसतो
राजकारणात मागच्या निवडणुकीत काय झालं कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. येणाऱ्या निवडणुबद्दल आखाडा आखावे लागतात. त्याबद्दल तुम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागते. जुन्या गोष्टी काढत बसलो तर अनेक गोष्टी निघतील. त्याला काही अर्थ नसतो, असंही अजित पवार यांनी सांगितलं.