मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आता एपिलेप्सी-पार्किन्सन रोगावरही उपचार; रूग्णालयाची अनोखी इन-हाउस ब्रेन जिम

जागतिक मेंदू दिनानिमित्त रूग्ण आणि सामान्य लोकांसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी, अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यासाठी हॉस्पिटलने इन-हाउस ब्रेन जिम आणली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांसह या क्लिनिकची सुरूवात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी असलेल्या रुग्णांना उत्तम दर्जाच्या उपचारांची हमी देते.

मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आता एपिलेप्सी-पार्किन्सन रोगावरही उपचार; रूग्णालयाची अनोखी इन-हाउस ब्रेन जिम
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 6:20 PM

मीरा रोड: मेंदूच्या आरोग्याकडे बहुसंख्य लोकांचे दुर्लक्ष होते. जागतिक मेंदू दिनानिमित्त (brain day),  मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्सने (Wockhardt Hospitals)  रुग्णांचे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाचे (Epilepsy and Parkinson’s disease) क्लिनिक सेवेत आणले आहे. एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगाचे व्यवस्थापन प्रशिक्षित तज्ज्ञ याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. जे उपचारपूर्व आणि उपचारानंतरच्या सर्व गरजा पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे या क्लिनिकचे उद्घाटन एपिलेप्सी आणि पार्किन्सन रोगावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या रुग्णांच्या हस्ते करण्यात आले.

मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल येथे शुक्रवारी 22 जुलै रोजी आयोजित क्लिनीकच्या उद्घघाटनप्रसंगी डॉ. पवन पै कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. अश्विन बोरकर कन्सल्टंट न्यूरो सर्जन, डॉ. दिपेश पिंपळे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. विनोद रंबल कन्सल्टंट न्यूरो सर्जन, डॉ. सिद्धार्थ वॉरियर कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. राहिल अन्सारी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, डॉ. बिपीन जिभकाटे सल्लागार न्यूरो इंटेन्सिव्ह केअर, डॉ. इम्रान खान सल्लागार न्यूरो रिहॅबिलिटेशन, डॉ. पंकज धमीजा सेंटर हेड वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड आदी तज्ज्ञ तसेच कर्मचारी उपस्थित होते. एपिलेप्सी रुग्ण अमित मिरानी (36) आणि पार्किन्सन रुग्ण अरुणा मोदी (83) यांनी त्यांच्या आजारावर केलेली मात आणि त्यादरम्यानचा प्रवास याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ

भारतामध्ये एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना एपिलेप्सी आणि पार्किन्सन्ससाठी योग्य उपचार मिळू शकत नाहीत. वैद्यकीय प्रगतीमुळे, या दोन दुर्बल समस्या आणि त्यांच्याशी निगडीत कॉमोरबिडीटीचे व्यवस्थापन करणे आता शक्य झाले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोडने एपिलेप्सी आणि पार्किन्सन्सच्या रूग्णांसाठी सर्वसमावेशक क्लिनीक सुरू करून एक मोठे पाऊल उचलले आहे जे नक्कीच रुग्णांकरिता फायदेशीर ठरत आहे.

पार्किन्सन्स रोग ही एक न्यूरोडीजनरेटिव्ह

यावेळी डॉ. पवन पै यांनी सांगितले की, पार्किन्सन्स रोग ही एक न्यूरोडीजनरेटिव्ह स्थिती आहे, ज्यामुळे मेंदूच्या पेशींमध्ये डोपामाइनची कमतरता उद्भवते. देशात पार्किन्सन्स आजाराचे प्रमाण वाढत आहे. अपस्माराच्या रूग्णांप्रमाणे, पार्किन्सन रोग असलेल्यांना देखील पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीला पार्किन्सन्सच्या रुग्णांना औषधोपचाराने बरे वाटते. या क्लिनिकमध्ये बोटॉक्स थेरपीदेखील उपलब्ध केली जाणार आहे.

मानसिकदृष्ट्या सक्षम

जागतिक मेंदू दिनानिमित्त रूग्ण आणि सामान्य लोकांसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी, अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यासाठी हॉस्पिटलने इन-हाउस ब्रेन जिम आणली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि उच्च प्रशिक्षित तंत्रज्ञांसह या क्लिनिकची सुरूवात पार्किन्सन्स आणि एपिलेप्सी असलेल्या रुग्णांना उत्तम दर्जाच्या उपचारांची हमी देते.

सामाजिक कलंक जोडलेला

डॉ. दिपेश पिंपळे सांगतात अपस्मार हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि ती एक मानसिक समस्या म्हणून ओळखली जाते. या स्थितीशी एक सामाजिक कलंक जोडलेला आहे. ज्यामुळे त्वरित वैद्यकीय लक्ष मिळणे कठीण होऊ शकते. या क्लिनिकद्वारे एपिलेप्सी आणि पार्किन्सन्स रोगाविषयी अधिक जागरूकता पसरवणे हे आमचे ध्येय आहे कारण हे रुग्ण अधिक चांगल्या जीवनासाठी पात्र आहेत. अपस्मार कोणालाही आणि कधीही होऊ शकतो. एपिलेप्सी असलेल्यांसाठी वेळेवर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत. आमच्या क्लिनिकमध्ये न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, न्यूरो रिहॅब तज्ञ, न्यूरो-टेक्निशियन आणि स्टाफ नर्स यांची टीम सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.