माझ्यावर हल्ला होऊ शकतो, उर्फी जावेदची तक्रार, महिला आयोगाचे पोलिस आयुक्तांना काय आदेश?
उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद विकोपाला गेल्याची चिन्ह आहेत.
मुंबईः विचित्र कपड्यांवरून प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. महिला आयोगाकडे (Women Commission) उर्फी जावेदने यांसदर्भात तक्रार दाखल केली आहे. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कधीही जीवघेणा हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता उर्फी जावेदने व्यक्त केली आहे. महिला आयोगानेदेखील उर्फी जावेदच्या तक्रारीची त्वरीत दखल घेतली आहे.
उर्फी जावेद प्रकरणी महिला आयोगाने आता थेट मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. महिाल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलंय. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवण्यात यावा, असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,”मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
उर्फी जावेदची तक्रार काय?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे, असं उर्फी जावेदने तक्रारीत म्हटलं आहे.
महिला आयोगाचे आदेश काय?
भारतीय राज्य घटनेने प्रत्येक भारतीयाला मुक्त संचाराचा हक्क दिला आहे. पण महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा. अशा सूचना राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिली आहे.
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया काय?
उर्फी जावेद हिच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने घेतली आहे. तर भाजप नेता चित्रा वाघ यांनीदेखील उर्फी जावेदवर टीका केली आहे. मी धमकी वगैरे काही दिलेली नाही. थेट इशारा दिला आहे की तू नागडी फिरू नकोस..
तिचा व्यवसाय, अथवा पेशाविषयी किंवा अंगप्रदर्शनाला आमचा विरोध नाही. तर ती ज्या प्रकारे रस्त्यावर फिरत आहे, त्याला आमचा विरोध असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
मी तिला धमकी दिलेली नाही, मात्र रस्त्यावर नागडं फिरण्याविरोधात धमकी दिली आहे. तिला काय फॅशन करायची आहे ती तिने चित्रपट किंवा तिच्या क्षेत्रात करावी, मात्र रस्त्यावर अशा पद्धतीने फिरू नये, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.