वरळी हिट अँन रन प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत जाहीर

वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

वरळी हिट अँन रन प्रकरणातील मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटूंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखांची मदत जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 11:41 PM

वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहा याला क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला. त्यावर स्पष्टीकरण देताना या प्रकरणात कोण कितीही मोठा असला तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते त्यावर आपण ठाम आहोत असेही शिंदे म्हणाले. तसेच या घटनेनंतर आज राजेश शहा यांना पक्षातून पदमुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक आणि ड्राइव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही ठाणे, पुणे, मुंबई पोलीस आयुक्तांना दिले असून ड्रिंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरीही तिला पाठीशी घातले जाणार नाही याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.

वरळी हिट अँड रन केल प्रकरणातील आरोपी मिहीर शाग याला पोलिसांनी अटक केली. आज बुधवारी शिवडी कोर्टामध्ये मिहीर शाहला हजर केलं गेलं होतं. कोर्टाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. येत्या 16 जूनपर्यंत मिहीर शाह पोलीस कोठडीत असणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.