वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 90 टक्के परिसर कंटेन्मेंट झोनबाहेर

| Updated on: Jul 21, 2020 | 11:14 AM

प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून वरळी कोळीवाड्यातील 90 टक्के परिसर वगळण्यात आला आहे. आता केवळ 17 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात आहेत

वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 90 टक्के परिसर कंटेन्मेंट झोनबाहेर
Follow us on

मुंबई : कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी कोळीवाड्यातील संकट ओसरु लागले आहे. वरळी कोळीवाडा भागातील अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊन 13 वर आल्याने प्रशासनासह रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे. (Worli Koliwada to become Corona Free)

वरळी कोळीवाड्याची संपूर्ण कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी टाळेबंद कराव्या लागलेल्या वरळी कोळीवाड्यात सध्या केवळ 13 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून 90 टक्के परिसर वगळण्यात आला आहे. आता केवळ 17 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रात असून लवकरच ही ठिकाणेही प्रतिबंधमुक्त होतील, असा आशावाद ‘जी-दक्षिण’ विभागातील सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : वरळी कोळीवाडा सीलमुक्त होण्याच्या मार्गावर, कोळीवाड्याने करुन दाखवलं!

वरळी कोळीवाड्याप्रमाणेच जिजामाता नगरमध्येही परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोळीवाडा, जनता कॉलनी, आदर्श नगरमध्ये 372 रुग्ण होते. त्यापैकी 299 बरे झाले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे.

तिन्ही भाग लक्षात घेता इथे 22 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील 13 रुग्ण वरळी कोळीवाड्यात आहेत.

पहा व्हिडीओ:

(Worli Koliwada to become Corona Free)