मुंबई : मुंबई पोलिसांच्या गाडीतच महिलेची प्रसुती झाली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरुप आहेत. वरळी परिसरात महिलेला रस्त्यातर प्रसुतीकळा सुरु झाल्या. अखेर पोलिसांच्या गाडीतच गर्भवतीची प्रसुती झाली. (Worli Pregnant Lady Delivery of Baby in Police Van)
वरळी नाका भागात 13 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एक गरोदर महिला रस्त्याने जात होती. अचानक चक्कर येऊन ती रस्त्यात पडली. नागरिकांनी तात्काळ या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या दोन गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या.
नायरच्या दिशेने निघताना वाटेतच प्रसुती
पोलिसांना संबंधित महिला गर्भवती असल्याचं समजलं. तिला प्रसुती कळाही येत होत्या. महिलेच्या सोबत तिचे कुटुंबीय किंवा ओळखीचे कोणीही नव्हते. शिवाय अॅम्ब्युलन्स बोलवण्या इतका वेळही पोलिसांकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी विलंब न करत महिलेला पोलिसांच्या गाडीत ठेवलं आणि नायर रुग्णालयात निघाले.
महिला पोलिसांच्या तत्परतेने बाळ-बाळंतीण सुखरुप
गाडीमध्ये उपस्थित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी अखेर गरोदर महिलेची पोलिसांच्या गाडीतच यशस्वीपणे प्रसुती केली. त्या महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचवले. मात्र वेळेपूर्वीच प्रसुती झाल्याने बाळाला दक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर आईची प्रकृती सुरक्षित आहे.
वरळी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार सपकाळ, वळवी, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, लोहार या सर्वांचं कौतुक केलं जात आहे.
लोकलमध्ये जुळ्या बाळांचा जन्म
मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेत दररोज काही ना काही घडत असतं. लोकलमध्ये महिलांच्या प्रसुतीच्या बातम्या तर ठराविक दिवसांनी येतच असतात. काही महिन्यांपूर्वी एका महिलेने लोकलमध्ये जुळ्या बाळांना जन्म दिला होता. महत्त्वाचं म्हणजे एका बाळाचा जन्म धावत्या लोकलमध्ये सफाळे स्टेशनजवळ तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वे स्टेशनच्या प्रतीक्षालयात झाला होता.
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या संकटात गोंडस मुलीला जन्म, 14 दिवसांच्या उपचारानंतर मायलेकीची भेट
लोकलमध्ये महिलेला जुळे, एका बाळाचा जन्म सफाळेत, दुसऱ्याचा पालघरमध्ये
(Worli Pregnant Lady Delivery of Baby in Police Van)