Video : Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | गेट वे ऑफ इंडिया बाबत पुरातत्व विभागाकडून चिंताजनक बातमी
अजस्त्र लाटा अन् अनेक वादळं झेलणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाबद्दल चिंताजनक बातमी समोर आलीय.
मुंबई : गेट वे ऑफ इंडियाबद्दल पुरातत्व विभागानं दिलेली एक माहिती चिंताजनक आहे. माहितीनुसार या ऐतिहासिक वास्तूच्या दर्शनी भागात भेगा पडू लागल्या आहेत. पाहूयात हा रिपोर्ट..
अजस्त्र लाटा अन् अनेक वादळं झेलणाऱ्या मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाबद्दल चिंताजनक बातमी समोर आलीय. महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागात भेगा पडल्यायत. अनेक ठिकाणी वनस्पतींची वाढ झालीय. घुमटावरचं वॉटरप्रूफिंग आणि सिमेंट काँक्रिटचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय. तडे गेल्यामुळे गेट वे ऑफ इंडियात कमकुवत होण्याची शक्यताही वर्तवली गेलीय.
गेट वे ऑफ इंडियाची इमारत 2024 मध्ये शंभर वर्ष पूर्ण करणार आहे. ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तूंची तातडीनं दुरुस्ती करावी, अशी विनंती राज्य पुरातत्व विभागानं महाराष्ट्र सरकारकडे केलीय. तर दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलीय.
काही वर्षांपूर्वी समुद्रातल्या वादळामुळे गेट वे ऑफ इंडियाजवळची भिंतीचा कठडा तुटला होता. तेव्हापासूनच गेट वे ऑफ इंडियाच्या दुरुस्तीबद्दल चिंता व्यक्त होत होती..