महाविकास आघाडीच्या मोर्च्यासाठी पोलिसांकडून लिखित परवानगी, बैठकीत होणार नियोजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्च्याला परवानगी देणार असल्याचं सांगितलं होतं. रिचर्ड्स क्रूडर्स या परिसरातून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.
मुंबई : महाविकास आघाडीला मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. उद्या मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा होतोय. कित्तेक दिवस या परवानगीची प्रतीक्षा होती. मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखडा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. आज महाविकास आघाडीच्या मोर्च्यासाठी लिखित परावानगी मिळालेली आहे.
उद्या महाविकास आघाडीचा महामोर्चा होणार आहे. वेगवेगळ्या मुद्यांसाठी हा महाविकास आघाडीचा महामोर्चा आहे. महागाईसह, राज्यपालांना हटविण्याची मागणी, यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे नेते उद्या रस्त्यावर उतरणार आहेत.
शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांना भेटले
भाईखडा येथील अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयात ठाकरे गटाचे नेत्यांचे शिष्टमंडळ गेले होते. मिलिंद नार्वेकर, सचिन अहीर, पांडुरंग सपकाळ, अनिल परब हे पोलीस कार्यालयात गेले होते. पोलिसांनी काही अटी, शर्टी घालून मोर्चाची परवानगी लिखित स्वरुपात दिली.
याठिकाणाहून होणार मोर्चास सुरुवात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्च्याला परवानगी देणार असल्याचं सांगितलं होतं. रिचर्ड्स क्रूडर्स या परिसरातून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. उद्याच्या महामोर्च्यासंदर्भात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आले होते. उद्या सभा होणार आहे. या सभेसाठी लाखो कार्यकर्ते एकत्र येणार आहेत.
उद्याच्या मोर्च्याचं आयोजन काय असेल, याचं मार्गदर्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केलं जाणार आहे. सचिन अहीर, किशोरी पेडणेकर, आमदार चौधरी तसेच शाखाप्रमुख उपस्थित झालेले आहेत.