हो, आम्ही बंड नाही; क्रांती, उठाव केला, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

आजच्या परिस्थितीत बोटचेपी भूमिका घेणारेही आहे. सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव दिला होता.

हो, आम्ही बंड नाही; क्रांती, उठाव केला, मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेत घोषणा
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:44 PM

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त पूर्वसंध्येला उपस्थित कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, ज्यांनी चौकार, षटकार लगावले ते संजय उपाध्ये, गजानन कीर्तीकर, आशिष शेलार उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ते बाळासाहेब हा कार्यक्रम आयोजित केला. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. तोही कार्यक्रम ठेवण्यात आला. शासनाच्या माध्यमातून राजभवनात कार्यक्रमात झाले. नोकरी मागताना नोकरी देणारे तयार करा, असं बाळासाहेब ठाकरे म्हणतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

काळ्या पाण्याची शिक्षा सावरकर यांनी भोगली. पुन्हा तुरुंगवास भोगावं लागलं. बाळासाहेबही आपली भूमिका प्रभावीपणे मांडायचे.पाकिस्तान एका व्यक्तीला घाबरायचे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. देशाचे पंतप्रधान यांनी काश्मिरमील ३७० कलम हटविलं. अयोध्येत मंदिर बांधकाम सुरू झाला.

देशाचा गौरव जगभरात पसरविण्याचं कामही मोदी करतात. आजच्या परिस्थितीत बोटचेपी भूमिका घेणारेही आहे. सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री आणि सगळ्यांना प्रस्ताव नियमात कसा बसत नाही, असं सांगितलं होतं.

तेव्हा मी पण मंत्रिमंडळात होतो. दुर्दैवी घटना पाहण्याची भूमिका आम्ही पार पाडत होतो. हे आम्ही जास्त काळ उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. हो, आम्ही बंड नाही क्रांती, उठाव केला, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

वेडात वेडे दौडले सात होते. ते आमचे ५० लोकं होते. परंतु, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं गेलो. नफ्या-तोड्याचा आम्ही विचार केला नाही. कुणाला काय मिळेल, किती फायदा-तोडा होईल, हे पाहिलं नाही. आम्ही जाहीर भूमिका घेतली. आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं सरकार आलं आहे. सावरकारांचा अपमान या राज्यातील जनता सहन करणार नाही.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.