मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त पूर्वसंध्येला उपस्थित कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, ज्यांनी चौकार, षटकार लगावले ते संजय उपाध्ये, गजानन कीर्तीकर, आशिष शेलार उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ते बाळासाहेब हा कार्यक्रम आयोजित केला. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. तोही कार्यक्रम ठेवण्यात आला. शासनाच्या माध्यमातून राजभवनात कार्यक्रमात झाले. नोकरी मागताना नोकरी देणारे तयार करा, असं बाळासाहेब ठाकरे म्हणतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
काळ्या पाण्याची शिक्षा सावरकर यांनी भोगली. पुन्हा तुरुंगवास भोगावं लागलं. बाळासाहेबही आपली भूमिका प्रभावीपणे मांडायचे.पाकिस्तान एका व्यक्तीला घाबरायचे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. देशाचे पंतप्रधान यांनी काश्मिरमील ३७० कलम हटविलं. अयोध्येत मंदिर बांधकाम सुरू झाला.
देशाचा गौरव जगभरात पसरविण्याचं कामही मोदी करतात. आजच्या परिस्थितीत बोटचेपी भूमिका घेणारेही आहे. सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव दिला होता. मुख्यमंत्री आणि सगळ्यांना प्रस्ताव
नियमात कसा बसत नाही, असं सांगितलं होतं.
तेव्हा मी पण मंत्रिमंडळात होतो. दुर्दैवी घटना पाहण्याची भूमिका आम्ही पार पाडत होतो. हे आम्ही जास्त काळ उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. हो, आम्ही बंड नाही क्रांती, उठाव केला, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
वेडात वेडे दौडले सात होते. ते आमचे ५० लोकं होते. परंतु, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढं गेलो. नफ्या-तोड्याचा आम्ही विचार केला नाही. कुणाला काय मिळेल, किती फायदा-तोडा होईल, हे पाहिलं नाही. आम्ही जाहीर भूमिका घेतली. आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचं सरकार आलं आहे. सावरकारांचा अपमान या राज्यातील जनता सहन करणार नाही.