मुंबई : निसर्ग अजब आहे. या पृथ्वीवर निसर्गाने जी विविध सजीवसृष्टीची रचना केली आहे की ती पहाताना आपण आश्चर्यचकीत होऊन आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, की असेही जग आहे. आपण अनेक किटक पाहीले असतील, परंतू झाडाच्या फांदीच्या रंगसंगतीच्या अनोख्या किटकाचा एक व्हीडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे.
मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरवर @Thefigen_ या अकाऊंवरून हा अनोखा व्हीडीओ शेअर केला आहे. 3 लाख 51 हजार जणांनी हा व्हीडीओ लाईक केला आहे. व्हीडीओत एका जणाने हातात झाडाची वाळलेली काटकुळी फांदी धरलेली असून तिच्यावर तो बोटाने टीचकी मारतात चमत्कार घडताना आपण पाहणार आहोत.
सुरूवातीला ही फांदीच्या सालीकडे पाहून बघताना असे वाटते या फांदीला हा का फटका मारीत आहे. त्यानंतर जेव्हा फांदीवर जे हलताना दिसते ते पाहून आपण आश्चर्यचकीत झाल्यावाचून राहणार नाही. कारण फांदीला चिकटलेली साल नसून तो एक प्रकारचा कीटक असल्याचे पाहून आपणाला खरोखरच धक्का बसतो. निसर्ग किती अजब घटनांनी, रंगानी,जीवांनी तसेच सजिवांनी भरलेला आहे, याची जाणीव होऊन आपण निसर्गासमोर किती खुजे आहोत याची जाणीव होते..
OMG I did not expect this! Nature is amazing…
credit twitter@deiberchacon pic.twitter.com/3WSjWmz4cw
— Figen (@TheFigen_) December 19, 2022