मुंबईकरांनो सावधान! दिल्ली पेक्षाही हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर?

मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे, हवेत धूलिकण पसरल्याची माहिती समोर येत असून ही परिस्थिती काही दिवस अशीच राहणार असल्याने दिल्ली पेक्षाही हवा प्रदूषण मुंबईत दिसून येणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबईकरांनो सावधान! दिल्ली पेक्षाही हवेची गुणवत्ता घसरली, एयर क्वालिटी इंडेक्स कितीवर?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 9:35 AM

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्याचा परिणाम मुंबईसह उपनगर आणि इतर जिल्ह्यात दिसून येत आहे. मुंबईतील हवामानाची स्थिती बघता थंडीचा जोर कायम आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आठवडाभर हा थंडीचा जोर कायम राहणार असून वायु प्रदूषण देखील वाढणार आहे. त्यातच दिल्ली पेक्षाही हवेतील प्रदूषण मुंबईत आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. एयर क्वालिटी इंडेक्स 300 अंकाच्या वर गेला आहे. सकाळच्या सत्रात देखील मुंबईच्या हवामानात मोठा बदल झालेला दिसून आला असून धुक्याची चादर मुंबईनगरीवर पडलेली दिसून आली आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार असे हवामान आठवडाभर राहण्याची शक्यता असल्याने मुंबईत आठवडाभर असाच गारवा राहणार आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे मुंबईतील हवामानात देखील मोठा बदल झाला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रात या थंडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवत होता.

परंतु मुंबई सारख्या शहरात देखील थंडीचा जोर अधिकच वाढला असून हवेतील प्रदूषण देखील वाढले आहे, मुंबईसह उपनगरात धुकं दिसून येत असून सातत्याने हवेतील प्रदूषण वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

सफर संस्थेच्या माध्यमातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 300 अंकांच्या वर मुंबईचा एयर क्वालिटी इंडेक्स गेला असून ही पातळी अधिक गडद होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

मुंबईतील हवा प्रदूषित झाली आहे, हवेत धूलिकण पसरल्याची माहिती समोर येत असून ही परिस्थिती काही दिवस अशीच राहणार असल्याने दिल्ली पेक्षाही हवा प्रदूषण मुंबईत दिसून येणार असल्याचा अंदाज आहे.

एकूणच उत्तरेकडील राज्यात असलेल्या कडाक्याचा थंडीचा सामना महाराष्ट्रासह मुंबईला देखील करावा लागत आहे. थंडी, धुके यामुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले असून दिल्लीपेक्षाही मुंबईचे हवामान दूषित होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.