Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 16 लाखाच्या अमली पदार्थांसह 4 आरोपींना बेड्या

मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरात केलेल्या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 4 आरोपीना अटक केली आहे. या आरोपांकडून 210 ग्रॅम एमडी अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेली आहे. या एमडीची बाजारातील किंमत तब्बल 16 लाख रुपये आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली आहे.

मुंब्रा पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 16 लाखाच्या अमली पदार्थांसह 4 आरोपींना बेड्या
मुंब्रा पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 12:53 PM

ठाणे : मुंब्रा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरात केलेल्या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 4 आरोपीना अटक केली आहे. या आरोपांकडून 210 ग्रॅम एमडी अमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेली आहे. या एमडीची बाजारातील किंमत तब्बल 16 लाख रुपये आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांनी दिली आहे. (Mumbra Police cracks down on narcotics, arrests 4 accused with Rs 16 lakh worth of narcotics)

19 नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील प्रभारी अधिकारी यांना एका खबऱ्याने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुंब्रा बायपास रोडवर वाय जंक्शन जवळ पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे व एन.डी.पी.एस. पथकातील पोलीस स्टाफने सापळा रचून आरोपी गोडविन इमानियल इफेनजी याला बेड्या ठोकल्या. तो नवी मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय. आरोपीची झडती घेतली असता 100 ग्रॅम एमडी पावडर सापडली. तिची किंमत बाजारात प्रति ग्राम 5 हजार 60 रुपये आहे. तर सापडलेला साठा हा 5 लाख 6 हजाराचा होता. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात नेले असता त्याला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अंमली पदार्थ विरोधातील दुसरी कारवाई 20 नोव्हेंबर रोजी

अंमली पदार्थ विरोधातील दुसरी कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोडवर एक इसम मोफेडीन (एम.डी.) पावडरसह विक्री करण्यासाठी येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापाला रचून आरोपी नदीम मेहबुब खानला अटक केली. तो अमृतनगर, मुंब्रा इथला रहिवासी आहे. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्रॅम मोफेडीन एमडी पावडर हस्तगत केली. त्याच्या विरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात नेले असता 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळेंच्या अधिकारात पुढील तपास

अटक आरोपी नदीम मेहबुब खान आणि आरोपी गोडविन इमानियल इफेनजी यांनी सदरची एमडी पावडर कुठून आणली आणि मुंब्रा परिसरात कुणाला विकणार होते? याबाबतचा तपास पोलीस करत आहेत. या कारवाईत स्वतः मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या :

विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं, चंद्रकांतदादांना विश्वास; अमल महाडिकांच्या विजयाचाही दावा

शेतकऱ्यांनो चिंता सोडा, आता शेतीमालाचे बाजारभाव तुमच्या मोबाईवरच, कसे ते पहा..!

Mumbra Police cracks down on narcotics, arrests 4 accused with Rs 16 lakh worth of narcotics

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.