पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख यांना खाली उतरवणारे पोलीस अधिकारी काय म्हणाले?; किती अवघड होतं उतरवणं?
मस्साजोग गावात पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणातील आरोपी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित वाल्मिक कराड यावर कारवाईची मागणी करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिसांनी समजूतदारपणाने संवाद साधून त्यांना खाली उतरवले.
पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकणातील आरोपी आणि मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याला तपास यंत्रणा वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड आहे असा आरोप केला जात असून वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पावित्रा घेत, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही सहभागी झाले. आज सकाळपासून पाण्याच्या टीकावर चढलेल्या धनंजय देशमुख यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खाली उडी मारू असा इशारा दिला होता. सुमारे चार तास चाललेल्या या आंदोलनामुळे मस्साजोग गावात प्रचंड खळबळ माजली होती. मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना घट्ट मिठी मारली आणि जोरात हंरडा फोडत ते रडू लागले.
पाण्याच्या टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांच्याशी बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी संवाद साधत त्यांची समजूत काढली. ‘ तुमच्या ज्या मागण्या आहेत, त्याबाब पोलीस प्रशासन सकारात्मक आहेत. मी स्वत: एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतो’ असे आश्वासन कॉवत यांनी दिलं. त्यानंतर अखेर धनंजय देशमुख हे खाली उतरण्यास राजी झाले. या नंतर त्यांनी खाली उतरून मनोज जरांगेंची घेतली, ते घराकडे रवाना झाले. त्यांच्याशी बोलण्यासाठीस संवाद साधण्यासाठी मीडियाकर्मींची घरापाशी झुंबड उडाली होती, मात्र मला अस्वस्थ वाटतंय. उलट्या होत आहेत. मी काही वेळाने बोलतो,असे सांगत देशमुख यांनी तत्काळ बोलण्यास नकार दिला.
देशमुख यांना खाली उतरवणारे पोलीस अधिकारी काय म्हणाले?
याच दरम्यान नीट बोलणी करून, आश्वासन देऊन धनंजय देशमुख यांना खाली उतरवणारे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी टीव्ही9 शी संवाद साधला. ‘ सीआयडीचा जो तपास सुरू आहे,त्याची माहिती मिळावी अशी त्यांची मागणी आहे. माझा सीआयडीच्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलाय. ते अधिकारी इथे येत आहेत. ते देशमुखांची भेट घेतील आणि त्यांना माहिती देतील, असे कॉवत म्हणाले. खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी करावे अशीही देशमुखांची मागणी आहे, त्याबद्दल काय भूमिका आहे, असे कॉवत यांना विचारण्यात आले, मात्र सध्या हा तपास सीआयडीकडे आहे, त्यामुळे त्याच्याबाबतीत मला काही सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं.
अडीच ते तीन तास हे आंदोलन सुरू होते, यावेळी तुम्ही स्वत: तिथे होतात, पोलीसांनी, तुम्हीही मध्यस्थी केली, मनोज जरांगेही तिथे होते, ते बोलले, देशमुख यांना खाली उतरवणं किती अवघड होतं ? याबाबतही नवनीत कॉवत स्पष्ट बोलले. एसपी म्हणून मी त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याज्या अडीअडचणी आहेत, त्या सोडवायचा प्रयत्न करू, असेही त्यांना सांगितलं, मगच बऱ्याचवेळाने ते खाली असं कॉवत म्हणाले.
त्यांच्याशी मी जेव्हा बोलेन तेव्हा मला कळेल,आत्तापर्यंत फक्त फोनवर बोलणं झालं, प्रत्यक्ष बोलल्यावरच मला कळेल की ते डिप्रेशनमध्ये आहेत की नाही, ते विचारू शकेन. मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे, प्रत्यक्ष, समोरासमोर मी त्यांच्याशी बोलेन,त्यांच्या अडीअडचणी समजून घेईन, को-ऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करेन, असे कॉवत यांनी नमूद केलं.
आम्ही त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. रात्रीपासून संपर्क साधला होता. सर्व माहिती दिली होती. सीआयडीच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा करून दिली होती असं चेतना तिडके या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमख यांच्याशी बोलून, समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तर मी रात्री त्यांना भेटलो होतो. त्यांच्याशी दोन तास चर्चा केली होती. त्यांचं म्हणणं एसपींना सांगितलं होतं. त्यानंतर सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर आम्ही पुन्हा त्यांना त्याच गोष्टी परत सांगितल्या,कमलेश मीना या पोलिस अधिकाऱ्याने सांगिलं.