संतोष देशमुख याला मारल्यानंतर व्हिडीओ कॉल करुन कोणत्या ‘आका’ ला दाखविले? भाजपाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व्हिडीओ कॉल करुन मारेकऱ्यांनी त्यांच्या 'आका'ला दाखविले असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज विधानसभेत केला आहे. या चर्चेच्या प्रसंगी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे या दोघापैकी कोणीही उपस्थित नव्हते.

संतोष देशमुख याला मारल्यानंतर व्हिडीओ कॉल करुन कोणत्या 'आका' ला दाखविले? भाजपाच्या आमदाराचा विधानसभेत आरोप
santosh deshmukh murder
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 8:50 PM

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यात खळबळ उडाली असून बीड येथे बिहारसारखे गुंडाराज सुरु झाल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड येथे कायदा आणि सुव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात विधानसभेत आज भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी धक्कादायक दावे केले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधी संतोष देशमुखला गाडीत उचलून न्यायचं महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता असा सनसनाटी आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख याची नियोजन पद्धतीने हत्या करण्यात आली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी आज विधानसभेत केला आहे. या चर्चेच्या प्रसंगी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे या दोघापैकी कोणीही उपस्थित नव्हते. संतोष देशमुखला गाडीत उचलून न्यायचं आणि महिलांची छेड काढली म्हणून त्याला माराहाण करायचा प्लान होता. कळंबला एक महिला तयार केली होती, त्या महिलेची चौकशी करायला हवी अशी मागणी यावेळी भाजपाचे सदस्य सुरेश धस यांनी केली.

संतोष देशमुखचे डोळे लायटरने जाळण्यात आले

संतोष देशमुख या तरुणाने भाजपा बुथप्रमुख म्हणून काम केले होते. त्याला 150 ते 200 ठोके मारण्यात आले होते. त्याला मारताना व्हिडीओ कॉल करून कोणाला तरी दाखवण्यात आल्याचे आहे. संतोष देशमुखचे डोळे लायटरने जाळण्यात आले. पाणी मागितलं तेव्हा दुसरं काहीतरी देण्यात आले. या प्रकरणात एक जरी अधिकारी दोषी आढळला तरी त्याच्यावर कठोर कारवाई करावी. आयपीएस दर्जाचा अधिकारी नेमून एसआयटी स्थापन करण्यात यावी अशी मागणी सुरेस धस यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी साधी तक्रार घेतली होती.

या प्रकरणात पोलिसांनी आधी साधी तक्रार घेतली होती. दुस-या दिवशी शनिवार ,रविवारी पीएसआय भोसले आणि सुदर्शन घुले संपुर्ण शहरात फिरत होते. महाजन यांच्या सोबत घुले फिरत होते. सुदर्शन घुले याला लगेच सोडण्यात आले. हॉटेलात सुदर्शन घुले आणि पीएसआय भोसले चहा पिताना दिसत आहेत. बीडचं आपण मिटवू असं सीसीटीव्हीत दिसत आहे. सुदर्शन घुले नावाच्या मुलाची मी माहिती घेतली. सुदर्शन घुलेचे सहा पत्र्याचं घर आहे. त्याला स्काँर्पिओ कुणी दिलेली आहे. सोनपेठवरून वाळूच्या गाड्या चालतात. तीनशे तीनशे गाड्या चालत असतात. दररोज कोटी रूपये गोळा केल्याशिवाय राहत नाही. या कंपन्यांना कोण बोलवून घेतं असा सवाल सुरेश धस यांनी केला आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.