धक्कादायक! बीडच्या ऊसतोड मजुराची कर्नाटकात दगडानं ठेचून हत्या
मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेलेल्या परळीतील मजुराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात ऊस तोडणीसाठी गेलेल्या परळीतील मजुराची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. विकास जोगदंड असं या ऊसतोड मजुराचं नाव आहे. मुकादमाची प्रकृती खराब असल्यानं तो आपल्या मुकादमाला उपचासाठी रुग्णालयात घेऊन गेला होता. तो त्या रात्री रुग्णालयाबाहेरच झोपला. याचवेळी दगडानं ठेचून त्याची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान विकास जोगदंड यांची हत्या नेमकी कशामुळे झाली हे अद्याप समोर आलेलं नाही, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याचं माहिती त्यांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील विकास जोगदंड हे ऊसतोड करण्यासाठी कर्नाटक राज्यात गेले होते. याचदरम्यान त्यांच्या मुकादमाची प्रकृती बिघडली. मुकादमाची प्रकृती बिघडल्यानं विकास जोगदंड हे आपल्या मुकादमाला घेऊन रुग्णालयात गेले. यावेळी ते रुग्णालयाबाहेर झोपले असताना त्यांच्यावर आरोपीने हल्ला केला. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने जोगदड यांच्या छातीवर बसून दगडाने ठेचून त्यांची हत्या केली.
रुग्णालयाबाहेर झोपेत असतानाच विकास जोगदंड यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यात दगड घालण्यात आला. त्यानंतर आरोपीने त्यांच्या छातीवर बसून त्यांच्यावर दगडाने वार केले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ही बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने आरोपीला पकडे, त्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास जोगदंड यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकातील घटप्रभा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हत्येचं कारण अस्पष्ट
दरम्यान या ऊसतोड मजुराची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. दगडानं ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जोगदंड कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.