Maharashtra CM : मुख्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चा,मुरलीधर मोहळ म्हणाले, पार्टीचा निर्णय आमच्यासाठी… ट्विट काय?

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालेलं असताना अचानक सोशल मीडियावर मुरलीधर मोहोल यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवाय उंचावल्या.

Maharashtra CM : मुख्यमंत्रीपदासाठी नावाची चर्चा,मुरलीधर मोहळ म्हणाले, पार्टीचा निर्णय आमच्यासाठी… ट्विट काय?
मुरलीधर मोहोळ
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 9:17 AM

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज आठवडा उलटला आहे. प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली असून सर्वात जास्त जागा जिंकत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. मात्र निवडणुकीच्या निकालाला आठवडा झाला तरी राज्याला अद्याप काही नवा मुख्यमंत्री मिळालेला नसून त्यावर अद्याप खलबत सुरू आहेत. गुरूवारी महायुतीच्या नेत्यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेत चर्चा केली. भाजपला या निवडणुकीत 132 जागा मिळाल्याने भाजपचाच मुख्यमंत्री राज्यात असेल हे स्पष्ट झालं आणि या यशाचे शिल्पकार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आपसूकच पुन्हा चर्चा सुरू झाली. त्यावर गेल्या आठवड्याभरपासून अनेक खलबत सुरू आहेत. पुढील आठवड्यात शपथविधी होऊन राज्याला नवा मुख्यमंत्री मिळण्याचे संकेत आहेत. मात्र असं असतानाच आता अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावर त्यांच्या नावाची बरीच चर्चा होत आहे.

मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या बातम्या साफ फेटाळून लावल्या आहेत. X या सोशल मीडिया वर साईटवर ट्विट करत त्यांनी या बातम्यांचे खंडन केलं आहे. समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी नमूद केलंय.

मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे खासदार असून लोकसभी निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी पुण्यात प्रचार सभा घेतली होती. ही निवडणूक जिंकत पुण्याचे खासदार म्हणून मोहोळ हे लोकसभेत पोहोचले. एवढंच नव्हे तर त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं. त्यांच्यावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. ते केंद्रात कार्यरत असतानाच आता अचानक राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक नेटकऱ्यांनीही त्याबाबत कमेंट्स केल्या.

मात्र आता ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हटलं मुरलीधर मोहोळ यांनी ?

समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला आहे, असे मोहोळ म्हणाले.

आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.