लग्नाच्या मंडपात नवरदेवाकडून लस घेण्याचं आवाहन, वऱ्हाडी म्हणाले ‘कबूल है,’ बुलडाण्यातील अनोख्या लग्नाची चर्चा

बुलडाण्यात उच्च शिक्षित असलेल्या मुस्लीम समाजाच्या नवरदेवाने स्वतःच्या लग्नात सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. आपल्या लग्नसमारंभात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना त्याने लग्न लावणाऱ्या मौलवींच्या मदतीने कोविड लस घेण्यास आवाहन केलेय. तर कोरोनावर नियमंत्रण मिळवण्यासाठी लस हा नामी उपाय असल्याचे या नवरदेवाने सांगितले आहे.

लग्नाच्या मंडपात नवरदेवाकडून लस घेण्याचं आवाहन, वऱ्हाडी म्हणाले 'कबूल है,' बुलडाण्यातील अनोख्या लग्नाची चर्चा
BULDHANA MARRIAGE
Follow us
| Updated on: Dec 03, 2021 | 9:38 PM

बुलडाणा : कोरोना लस घेण्यासंदर्भात काही ठिकाणी अजूनही गैरसमज आहे. या गैरसमजाला बळी पडून अनेक नागरिक कोविडची लस घेण्यासाठी धजावत नाहीत. शासनाकडून जनजागृतीच्या माध्यमातून ही सर्व मिथकं दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बुलडाण्यात उच्च शिक्षित असलेल्या मुस्लीम समाजाच्या नवरदेवाने तर स्वतःच्या लग्नात लस घेण्याचे आवाहन करत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. आपल्या लग्नसमारंभात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना त्याने लग्न लावणाऱ्या मौलवींच्या मदतीने कोविड लस घेण्यास आवाहन केलेय. कोरोनावर नियमंत्रण मिळवण्यासाठी लस हा नामी उपाय असल्याचे या नवरदेवाने सांगितले आहे.

लस घेण्याचे वऱ्हाडी मंडळींना आवाहन

लग्नसमारंभात लग्न लावण्याच्या वेळी व्यासपीठावर नवरदेव मोहम्मद आमीर पोहचल्यानंतर त्यांनी लग्न लावणाऱ्या मौलवींना एक विनंती केली. आमीर यांनी मौलवी यांच्या माध्यमातून लग्न मंडपाच्या बाहेर सुरू असलेल्या कोविड लसीकरण शिबिरात लग्न समारंभात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना लस घेण्याचे आवाहन केले.

मौलवींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी घेतली लस 

विशेष म्हणजे लग्नाची तिथी वाचल्यानंतर मौलवी रहेमत हाफिज यांनी शेवटी उपस्थित वऱ्हाडी मंडळींना कोरोनावर एकमात्र उपाय असलेली कोविड लस घेण्यास आवाहन केले. यावेळी मी सुद्धा लग्नानंतर माझ्या पत्नीसोबत कोविड लस घेणार असल्याचे नवरदेव आमीर यांनी सांगितले. मौलवींनी आवाहन केल्यानंतर अनेक वऱ्हाडी मंडळींनी लसीकरण शिबिरात जाऊन लसीचे डोस घेतले. याची सुरुवात नवरीकडून लग्नासाठी आलेले इस्माईल चौधरी यांनी जेवणानंतर थेट लसीकरण शिबिरामध्ये जावून कोविड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर लस घेण्यासाठी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी रांगा लावल्या होत्या.

इतर बातम्या :

विधानसभा अध्यक्षपदाची निवड हिवाळी अधिवेशनातच, नाना पटोलेंकडून स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनाही प्रत्युत्तर

Mamta banerjee : ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रगीताचा अवमान केल्याची भाजपची तक्रार

‘मेस्मा कायदा अत्यावश्यक सेवेसाठी लागतो, एसटी अत्यावश्यक सेवेत येते’, अनिल परबांचा सूचक इशारा

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.