Pune : मेट्रोचं उद्घाटन न झाल्याने मविआ आक्रमक, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर आंदोलन
पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत.
पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात त आहे. शिवाजीनंगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी मविआच आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाच उद्घाटन होणार होत, मात्र पावसामुळे त्यांचा पुणे दौरा रद्द झाला आणि हे उद्घाटनही लांबणीवर पडलं. मात्र यामुळे पुण्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता येत्या रविवारी या मेट्रो मार्गाचं ऑनलाइन उद्घाटन करणार आहेत. मात्र त्या आधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनबाहेर त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. नरेंद्र मोदी हाय हाय अशा घोषणाही देण्यात आल्या आहेत.
आजच्या आज मेट्रो स्टेशनचं उद्घाटन करावं अशी मागणी मविआकडून करण्यात येत आहे. आक्रमक झालेले कार्यकर्ते मेट्रो स्टेशनच्या आत घुसण्यााठी प्रयत्न करत आहेत. मात्र याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मेट्रो स्टेशनच्या आत जाण्याची परवानगी नसल्याने पोलिस त्यांना रोखत आहेत. मात्र त्यामुळे आंदोलक आणि पोलिस यांच्यात बराच वाद सुरू असून मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मेट्रो सुरू होईपर्यंत घरी परत जाणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असून मेट्रो स्टेशनबाहेरील वातावरण एकंदर खूप तापल्याचं दिसत आहे.
मेट्रो कोणाच्या बापाच्या मालकीची नाही
पुण्याच्या जनतेला वेठीस धरू नका. तुमच्याकडे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते उद्घाट का नाही केलं ? आम्ही एवढा टॅक्स भरतो, तरी या गोष्टींसाठी आम्हाला त्रास का देता. ही मेट्रो आमच्या पैशांतून सुरू झाली आहे, कोणाच्या बापाची नाहीये असे म्हणत संतप्त कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली. लोकांसाठी ही मेट्रो आहे, त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने ताबडतोब ही मेट्रो सुरू केली पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली. .
हा पुणेकरांचा अपमान आहे
मोदी पावसाला घाबरून पुण्यात येत नाही, हा पुणेकरांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही कधीच विसरणार नाही. मेट्रो सेवा प्रवाशांसाठी लवकरात लवकर सुरू झालीच पाहिजे ही आमची मागणी आहे. तुमच्यात दम नाही, पण आमच्यात दम आहे, असे म्हणत एका कार्यकर्त्याने संतप्त प्रतिक्रिया देत टीका केली.