संभाजीनगर : संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त सभा होत आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासह आघाडीचे अनेक नेते संबोधित करणार आहेत. संभाजीनगरात नुकताच झालेला राडा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचं आयोजन. ठाण्यातही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा निघणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गौरव यात्रेत सहभागी होणार. शंकराचार्य हिंदू धर्माचे पंतप्रधान, बागेश्वर बाबाचं विधान. यासह राज्यासह देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
– फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यादरम्यान हाणामारी
– प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्या प्रकरणी तेरा जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल,
– याप्रकरणी अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
– याबाबत विरेंद्र पद्रदेशी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली,
– फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यातील उपांत्यफेरी सुरू होती. त्या वेळी चेंडूच्या ताब्यावरून वाद झाला.
– प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली
अमरावती ब्रेकिंग
अमरावती शहर पोलिस दलाच्या शिपाई पदाच्या लेखी परीक्षेसाठी तबल 49 टक्के उमेदवार गैरहजर…
लेखी परीक्षेसाठी 222 उमेदवारांपैकी केवळ 144 विद्यार्थ्यांनीच दिली लेखी परीक्षा..
20 जागासाठी 222 उमेदवार ठरले होते पात्र;जागा कमी असल्याने उमेदवारांनी पाठ फ़िरवल्याची शक्यता…
ग्रामीणच्याही 15 टक्के उमेदवारांचीही लेखी परीक्षेकडे पाठ…
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :
संभाजीनगरमध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. या व्यासपीठावरुन मी अनेकदा आपल्याशी संवाद साधला आहे. गेल्यावर्षी ८ जूनला होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मी ज्या-ज्यावेळेला या मैदानावर येतो तेव्हा गर्दीचा दुष्काळ बघितलेला नाही. आज अभिमान, समाधान आणि आनंदाने आलेलो आहे. कारण हेच ते मैदान, हेच ते शहर, जिथे १९८८ साली आपण महापालिका शिवसेनेच्या हाती दिल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर करतोय असं म्हटलं होतं. त्यानंतर काय घडलं ते आपण पाहिलं. आपण २५ वर्ष भ्रमात होतो. दोनवेळा आपलं सरकार आलं. दोन्ही वेळेला केद्रात आणि राज्यात युतीचं सरकार होतं. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. त्यामुळे मी मविआच्या सहकाऱ्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ते करुन दाखवलं. यावरुन त्यांची वृत्ती समजून आलीय. निवडणुका आली की जातीय तेढ निर्माण करायची. ज्यावेळेला जातीय तेढ निर्माण होईल तेव्हा समजा निवडणुका जवळ आल्या आहेत.
गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला. जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झालाय. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवनपर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे? मविआच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती. गेल्या रविवारी मालेगावात असंख्य हिंदू बांधव सभेसाठी आले होते. आताही आलेत.
माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन पुन्हा तोंड दाखवू नका. जातीय रंग देत असाल तर हा घटनेचा अवमान आहे. मी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडतो. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का?
तुमची मस्ती असेल तर ती गाढण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे. लाखो युवक सुशिक्षित आहेत. अनेकांची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. अलिकडे डॉक्टरेटही विकत घेता येते. काहीजणं पाणीचं इंजेक्शन घेऊन फिरतो. अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर २५ हजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघं एकाच शााळेचे आहोत. बालमोहन विद्यामंदिरचे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय?
मला एक सांगा, मविआचं सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. मला अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकार फोडायचं आणि पाडायचं. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता?
मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा हे. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणीही सोम्या गोम्या आमच्यावर काहीही म्हणायचं. मोदींना म्हटलं की ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भाजप आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलं जातंय. विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. सर्व विरोधी पक्षाचे भ्रष्ट नेते भाजपात. तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा.
अजित पावारांनी जो उल्लेख केला की, मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकेकाळी भाजपच्या मंचावर साधुसंत असायचे. पण आता संधीसाधू होते. पण तो जमाना अटलजींचा होता. या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचं नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय. सावरकरांची यात्रा काढताय तर काढा. पण त्यांचं अखंड हिदुस्तानचं स्वप्न पूर्ण कराल का?
अमित शाह म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवायचं आहे. जमीन दाखवायचं असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेल यांचा मोठा पुतळा बांधला आहे. वल्लभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही? हा प्रश्न आहे. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? घुसवा फौजा. पण निवडणुका आल्यानंतर काहीतरी करणार आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या.
लोकशाही कशी असली पाहिजे तर इस्त्राईलसारखी असली पाहिजे. जो घातक प्रकार आख्य़ा देशात भाजप करु इच्छित आहे, न्यायव्यवस्थेत आपली माणसं घेऊ पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचं ऐकलंच पाहिजे, असे प्रयत्न सुरु आहेत. ज्यादिवशी न्यायालयावर यांच्या ताब्यात जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. इस्ज्ञाईलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र. नेत्यान्याहू यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा देशाने संप पुकारला. मंत्री, पोलीस प्रमुख संपावर गेले. राष्ट्रपतींनीसुद्धा पंतप्रधानांना झापलं. लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं.
तुम्हाला निवडून दिलं म्हणून वाटेल ते करु नका. पंतप्रधानांवर वचक देण्याचं काम करु नका. सर्वोच्च न्यायलय या सरकारला बोललं तसं आपण नाही. आपण घटनेचं रक्षण करणार. बघुया कोण येतंय की घटना पायदडी तुटवणार नाही, ही जिद्द आमच्यामध्ये आहे.
जय जवान, जय किसान तसं जय कामगार. तुम्ही मेहनत करता. तुम्ही म्हणाल तर आम्ही राज्यकर्ते. राज्यकर्त्याचं काम हे देशाला दिशा देण्याचं. दिशा चुकली तर सत्तेवरुन तुम्ही पायउतार करु शकता.
शेतकरी विम्याचे पैसे घ्यायला जातो तेव्हा दहा रुपयाचे चेक दिले जातात. विमा कंपनी कुणाची? तर अदानीची. आपलं सरकार होतं तेव्हा आपण का नाही हे केलं? असं विचारता. पण आम्ही फसवाफसवीचे धंदे केले नाही. आम्ही दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केलं होतं. हे सरकार गेलं नसतं तर नियमित कर्जफेड भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार राशी देणार होतो.
आता कोरोना वाढतोय. मी जे काम घरातून केलं ते तुम्ही दिल्ली, गुवाहाटी जावून होणार नाही. परवा मी मालेगावात गेलो होतो. गेल्यावर्षी एका कांद्याची खरेदी झाली. एका कांद्याला ५० खोके, मगा कांद्याच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळायला पाहिजेत?
आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला कोण असतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लाथ पारत आहेत. त्यांना खाली खेचायचं आहे. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर मोदींनी यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी.
आज मित्रपक्ष कठीण काळात सोबत राहीले हे विसरु नका. तुम्ही माझं काय चोरणार. मला माझ्या जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या सभेला तुम्ही माणसं भाड्याने लागतात. सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका.
आमचं सरकर खेळणारं नाही तर देणरं आहे म्हणे. काय दिलं? तरुणांना रोजगार दिलं. शेतकऱ्यांना हमीभाव दिला? राजेश टोपे यांनी आरोग्य खातं ज्या पद्धतीने सांभाळलं होतं त्याबद्दल धन्यवाद देतो. राजेश टोपे यांना औषधांचं नाव तोंडपाठ होतं. पण आताचे आरोग्य मंत्रा आहेत ते… जाऊद्या त्यांच्यावर कोणताही विषय बोलण्यासारखं नाही.
आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सीबीआय, ईडी घरात घुसवता. अनिल देशमुख यांच्या नातेची चौकशी करता, तेजस्वीच्या पत्नीची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत होता हे तुमचं निर्घृण हिंदुत्व. कशाला हिंदुत्वाचं नाव घेता? ज्या छत्रपतींना कल्याणच्या सुभेदारांच्या सूनेला सन्मानाने परत पाठवलं होतं हे आमचं हिंदुत्व होतं. एक नेता आमच्या सुषमा अंधारेंना खालच्या पातळीवर बोलतो हे तुमचं हिंदुत्व नव्हतं. हे ज्यावेळेला शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं तसं बोलण्याची हिंमत नव्हती. हाकलून दिलं असतं. महिलेला शिवीगाळ करणं ही गटारगंगा मी खपवून घेणार नाही. तुम्ही भगवा हाती घेऊ नका, तो तुम्हाला शोभत नाही.
नुस्ती सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता. आम्ही तुमच्यासोबत होतो. मी शिवेसनाप्रमुखांना काय वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन, असं वचन दिलं नव्हतं. हे मी अमित शाह यांना स्पष्ट सांगितलं होतं. आजसुद्धा तुम्ही शिवसेना फोडली. पण तरीही हृदयावर दगड ठेवून बसला आहात ना? मिंदेंंचं ओझं डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशासाठी चालवला आहे? शिवसेना संपवण्यासाठी? पण ते तुम्हाला पेलवणार नाही.
ही आमची सभा. या सभेला वज्रमूठ असंच नाव दिलेलं नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला मोठं करण्याची वृत्ती दिली. मोठी करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, सोसलो, अगदी सावरकरांचे भक्त आले असते, ज्या सावरकरांनी 14 वर्ष भोगलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं. तेच स्वातंत्र्य धोक्यात आहे हे भाजपमधल्या सावरकर भक्तांना मान्य आहे का? आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे नाहीतर आपणच आपल्या देशात गुलाम होऊ.
आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. औरंगजेबाचं मी गेल्यावेळी उदाहरण दिलं होतं. तिथे सीमेवर दलमॅन होता त्याचं नाव औरंगजेब. तो सुट्टी घेऊन कुटुंबियांना भेटायला जात होता पण दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. तो औरंगजेब देशासाठी शहीद झाला.
जो आपल्या घटनेवर प्रहार करेल त्याच्या चिथळ्या उडवल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करा.
अजित पवार यांच्या भाषणाला सुरुवात
अजित पवार यांच्या भाषणातील मुद्दे :
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मला आठवतंय फार सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि आम्हा सर्वांना सांगितलं होतं की, आपण वेगवेगळ्या भागातील पक्षाच्या कार्यकर्तांना एकत्र आणण्याचं काम करायलं हवं. कारण आपण कोणत्या कारणाने एकत्रित सरकार आणलं आहे त्यासाठी स्थानिक पातळीवर एकत्र आणू, पण कोरोना काळमुळे ते जमलं नाही. त्यानंतर काही राजकीय घडामोडी घडलं आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकार पायउतार झालं. त्यानंतर आज अशाप्रकारची पहिली सभा होतेय. अशी सभा संपूर्ण राज्यात होईल. आपलं सगळ्याचं स्वागत करतो.
मराठी माणसावर जेव्हा संकट येतो तेव्हा मराठी माणूस पेटून उठतो. मराठी माणूस कुठेही कमी पडणार नाही. मविआ येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, लोकसभा निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडून येण्याकरता सगळेजण जीवाचं रान करतील.
हिदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. प्रबोधनकारांनी या संघटनेचं नाव काय असावं ते सांगितलं. आम्ही विरोधी पक्षात काम करतो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. पण अशापद्धतीने निकाल देणं माझ्या निदर्शनास आलं नाही. आम्ही संविधानापुढे नतमस्तर झालो. संविधानाचा सन्मान केला पाहिजे. पण त्याला तिलांजली देण्याचं काम केलं. सरकार पाडण्याचा जो प्रयत्न झाला, असंच घडत राहीलं तर देशात स्थिरता राहणार नाही. उद्योगधंदे येणार नाही. विश्वासाचं वातावरण निर्माण होणार नाही. प्रशासनदेखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही.
एक बाजूला गेला. निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली. निवडणूक आयोग अशाप्रकारे निकाल देणार तर कसं होणार? सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आपलं लक्ष आहे. न्यायदेवता योग्य न्याय देईल अशी खात्री आहे.
मराठवाडा मुक्त व्हायला 13 महिने लागले. या संघर्षाच्या काळासाठी मुख्यमंत्री 13 मिनिटे वेळ देतात? स्वातंत्र्य सैनिकांची इतकी उपेक्षा दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केली नसेल.
गौरव यात्रेबद्दल बोललं गेलं. संभाजीनगर किंवा इथल्या मराठवाड्याच्या जनतेने पाहिलं की, याआधीच्या राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान केला नाही? त्यांच्या मंत्र्यांनी बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान केला. त्यावेळी यांची दातखिळी बसली होती का? आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर आहे. सावरकरांबद्दल काही बोललं गेलं की, काही मान्यवरांनी वडिलकीच्या नात्याने सांगितल्यानंतर शांतता झाली. पण आज इथे सभा असताना गौरव यात्रा काढतात. त्याला आमचा विरोध नाही. पण छत्रपतींच्या नावाने राजकारण करतात. छत्रपतींच्या अपमान झाला तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत. महाराष्ट्राची जनता हे विसरणार नाही.
अलिकडच्या काळात सुप्रीम कोर्टाने काय मत व्यक्त केलं की, हे शक्तीहीन सरकार आहे. मी म्हणत नाही. जनतेलाही माहिती आहे, नपूंसक सरकार आहे, हे सुप्रीम कोर्ट म्हटलं आहे. जणाची नाहीतर मनाची वाटू द्या. यामुळे राज्याचंही नाव खराब होतं. आम्ही अधिवेशनाच्या काळात सर्व मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत होतो. शेतकऱ्यांची थट्टा करतात. मस्करी करतात. त्या शेतकऱ्यांना जगावसं वाटत नाही. तुमच्या काळात रोज नऊ शेतकरी आत्महत्या करतात आणि सांगतात की गरीब जनतेचं सरकार आहे.
शेतकऱ्यांना कांदा पिकवला. त्यांना कांदा विक्रीचा अधिकार आहे. पण राजकारण चाललं आहे. निव्वळ समाज, धर्म, पंथ, प्रांत आणि भाषांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही साधू-संतांची भूमी आहे. आपल्या मुस्लिम बांधवाचा रमजान महिना सुरु झालाय. मी गुढीपाडवा, महावीर जयंती, महात्मा फुले जयंती,त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो आणि पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो.
सावरकरांबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हाला अभिमान असेल तर सावरकरांना भारतरत्न देवून दाखवा. छत्रपती संभाजीनगरमध्ये घटना घडण्याचं काय कारण होतं? महाविकास आघाडीची सभा होऊ नये म्हणून? हे कोणतं राजाकारण आहे. आम्ही आमचं मत मांडू. तुम्ही तुमचं मांडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. काही जणं निव्वळ वातावरण खराब करत आहे. शेतकरी, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्याचं वातावरण चांगलं राहिलं नाही तर उद्या कोणताही उद्योजक महाराष्ट्रात येणार नाही.
महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मविआचा एकोपा टिकवायचा आहे. वरच्या पातळीत आम्ही प्रयत्न करु. पण स्थानिक पातळीवरही तो एकोपा टिकवूया ही विनंती करतो.
छत्रपती संभाजीनगर :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील सभास्थळी दाखल
उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये दाखल
थोड्याच वेळात सभेला सुरुवात होणार
वाहन कर्जाची घाई करता कशाला
व्याजाची रक्कम भरून कशाला करता नुकसान
तरीही घरासमोर उभी राहील नवी कोरी चारचाकी
त्यासाठी फॉलो करावा लागेल हा नियम, बातमी एका क्लिकवर
विमाधारकासह वारसांची आता नाही होणार फसवणूक
त्यासाठी करा हे काम पटापट, नाहीतर येईल अडचण
नव्या नियमांचे विमाधारकांसह वारसदारांना फायदा
कंपन्यांच्या आमिषाला असा बसेल आळा, वाचा बातमी
मुंबई :
उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सभेसाठी मुंबईहून रवाना झाले आहेत
संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा
या सभेसाठी उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दिशेला रवाना झाले आहेत
सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चा
बाजारात उपलब्ध दोन नोटांवरुन मोठा संभ्रम
500 रुपयांची नकली आणि असली नोट कोणती
आरबीआयने केली भूमिका स्पष्ट , नागरिकांना काय दिला संदेश, वाचा बातमी
हिंदुहृदयसम्राट विनायक दामोदर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा वाचाळवीर उल्लेख करत जाहीर निषेध
डोंबिवलीत ब्राम्हण महासंघाकडून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ बॅनरबाजी
महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात वज्रमुठ सभेसाठी रवाना
समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला धक्का
महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करणार
धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक शिंदे गटात येणार
25-30 पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे प्रवेश करणार
आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश करणार आहेत….सविस्तर वाचा
दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा येत्या पाच एप्रिलला होत आहे. या दिवशी महाराष्ट्र कर्नाटकसह आंध्र प्रदेशातून लाखोंच्या संख्येत भाविक जोतिबा डोंगरावर येत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जोतिबा डोंगरावरील अतिक्रमण काढून घेण्यात आली. ज्योतिबा मंदिरांकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर स्थानिक विक्रेत्यांची अतिक्रमण हटवून हा भाग रिकामे करण्यात आलाय. त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ, बस स्थानक यासह महत्त्वाच्या ठिकाणांवरील अतिक्रमण हटवण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये होत असलेल्या उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सभेसाठी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका छोटेसे गावातून एक निष्ठावंत उद्धव ठाकरे यांचा चाहता तब्बल साठ किलोमीटरवरून बिना चपलेचा अनवाणी पायाने हातात मशाल आणि उद्धव ठाकरेंचा झेंडा घेऊन चालत आलेला आहे
एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर नाशिकमधील पाहिलं शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे आज उद्घाटन
खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचे लोकार्पण सोहळा पडणार पार
कॉर्पोरेट लूक असलेले हे कार्यालय उत्तर महाराष्ट्राचं केंद्र असणार आहे
वॉर रूमसह विविध कक्ष या कार्यालयात करण्यात आले आहेत तयार
महाविकास आघाडीला कोणाचीही भीती नाही
भाजप आणि शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकारला आहे
गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांचे हरासमेंट केले जात आहे
फडणवीस आणि शिंदे डोंबाऱ्या सारखे नाचत आहेत
भाजपकडून राज्यात हुकूमशाही आणण्याचे काम सुरू
ते मोडीत काढण्याचे काम आज आम्ही वज्रमूठ द्वारे करणार आहोत
सावरकर यांच्यावर भाजपचे खरच प्रेम असेल तर त्यांना भारतरत्न द्या
चांगलं काम करणाऱ्यांच्या विरोधात भाजप षडयंत्र रचत आहेत
उद्धव ठाकरे आज सर्वांचा समाचार घेणार आहेत
खासदार अमोल कोल्हे हे अभिनेत्री अमृता खानविलकरशी विवाह करणार?
सोशल मीडियावर चर्चांना उधाण, वाचा सविस्तर..
जत मध्ये खुनाची मालिका सुरूच, आणखी एका तरुणाचा निर्घृण खून.
15 दिवसात आणखी एकाची निर्घृण हत्या.
जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या यल्लमा रोड जवळ झाला खून
शशिकांत बिरा मदने ,वय 28 ,असे तरुणाचे नाव
खुनाचे कारण अस्पष्ट, घटनास्थळी जत पोलीस दाखल
या 10 PSU Stocks ची धमाल
गुंतवणूकदारांना दिला जोरदार परतावा
गेल्या दोन दशकांत दोन आकडी दिला लाभांश
प्रत्येकाच्या पोर्टफोलिओत हवेच हे शेअर, बातमी एका क्लिकवर
संजय राऊत आजच्या महाविकास आघाडीच्या सभेत उपस्थित राहणार नाही
महत्वाच्या कामाने दिल्लीलाला जात आहे.
संजय राऊत यांच्यांविना होणार मविआची सभा
त्यासोबतच ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ई-वाहनांची खरेदी सुध्दा तिप्पट झाली
कोरोनानंतर पुणेकरांनी वाहन खरेदी करण्यावर मोठा जोर
2021-22च्या तुलनेत पुणेकरांकडून 2022-23 या आर्थिक वर्षात तब्बल 2 लाख 92 हजार 258 वाहनांची खरेदी
तर 2021-22 या वर्षात 1 लाख 70 हजार 537 वाहनांची खरेदी करण्यात आली होती
भावात दररोज नवीन विक्रम
जानेवारी ते मार्च या तिमाहीत सर्वाधिक रिटर्न
सोन्याने गुंतवणूकदारांना केले मालामाल
चांदीने दिला सर्वाधिक परतावा, वाचा बातमी
पुण्यातील शिरगावच्या सरपंचाची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरपंचांचे प्रवीण गोपाळे असं नाव होतं. तीन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोपाळे वर कोयत्याने हल्ला केला.ही हत्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केले, त्यानंतर ते भर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
महाबळा कोटंबा शिवारातील घटना
कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू
ट्रक आणि कार नागपूरकडे जात होते
महाबळा कोटंबा शिवारात कार मागेहून ट्रकला धडकली
छाननीत अपात्र ठरलेल्या सतेज पाटील गटाच्या 29 उमेदवारांच भवितव्य मंगळवारी ठरणार
अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 4 एप्रिलला होणार सुनावणी
प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या दालनात होणार सुनावणी
अपात्रेचा निर्णय रद्द करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी एक लाख तीस हजार पानांचे पुरावे केलेत सादर
मंगळवारी होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष
यंदाच्या आर्थिक वर्षात पुणे शहरामध्ये तब्बल 2 लाख 92 हजार वाहने वाढली
ई-वाहन खरेदीला गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रचंड प्रतिसाद
ई-वाहनांची खरेदी यंदा तिप्पट
2021-2022 या वर्षात 1 लाख 70 हजार 537 वाहनांची खरेदी करण्यात आली होती
आणखी 67 शेतकऱ्यांनी दाखल केली फसवणुकीची तक्रार
आतापर्यंत 108 शेतकऱ्यांनी आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात दिली तक्रार
सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात शेअर्स रकमेपोटी प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊनही सभासद केल नसल्याचा आरोप
यासंदर्भात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होता फसवणुकीचा गुन्हा
आमदार मुश्रीफ यांच्या विरोधातील फसवणुकीचा गुन्हा नुकताच करण्यात आलाय आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
गुन्हा आर्थिक शाखेकडे वर्ग होताच तक्रारदारांची संख्या ही वाढू लागली
तब्बल एक हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा राहणार बंदोबस्त
शहरात दोन डीआयजी सह तीन आयपीएस अधिकारी
4 डीसीपी, 3 एसीपी, 20 पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक राहणार तैनात
तर शहरात एक रॅपिड एक्शन फोर्स आणि तीन एसरपीएफच्या तुकड्या तैनात
भाव 80 डॉलर प्रति बॅरलच्या घरात
देशात पेट्रोल-डिझेल महागले काय
पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच जाहीर केले भाव
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत काय, वाचा बातमी
आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील 20 जण बाधित झाले
शहराबाहेरील 04 रुग्ण असे एकूण 24 रुग्ण बाधित
73 वर्षीय पुरुष व 87 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला
मिळकतकर आणि बांधकाम विभागापाठोपाठ महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाही मालामाल
या आर्थिक वर्षामध्ये पाणीपुरवठा विभागाला तब्बल १४९ कोटी २९लाख रुपये उत्पन्न,
मागील दोन वर्षांपूर्वीच्या उत्पन्नाचा विचार करता,खात्याने तब्बल ५० कोटी रुपये अधिक उत्पन्न मिळाले
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती
दुपारनंतर शहरातील तीन मोठे रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद
मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते राहणार बंद
सभेला येणाऱ्यासाठी कर्णपुरा मैदानावर असेल पार्किंची व्यवस्था
सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांसाठी हर्सूल सावंगी रस्त्यावर असेल मनाई
सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांना केम्ब्रिज चौक जालना रोड मार्गे कर्णपुरा मैदानावर येणाच्या सूचना
महाविकास आघाडीची आज शहरात विराट जाहीर सभा
महाविकास आघाडीच्या या सभेला वज्रमुठ सभा असे नाव
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार जाहीर सभा
सभेला महाविकास आघडीतील डझनभर बडे नेते राहणार उपस्थित
उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पाटोळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे, अमित देशमुख, सुभाष देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, राजेश टोपे असे अनेक राहणार उपस्थित
हाणामारीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात
शीघ्र कृती दलाच्या पथकासह गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
1) स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा
वेळ :- सकाळी 10.00 वाजता
ठिकाण :- (गडकरी रंगायतन बाहेरील सावरकर स्मारकापासून यात्रा सुरू होणार असून त्यानंतर ठाणे शहरात ठिकठिकाणी ही यात्रा जाईल.)
2) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद
संध्याकाळी :- 5.00 वाजता
स्थळ :- आंनदआश्रम, टेम्भी नाका, ठाणे (पश्चिम)
3) विक्रोळी येथील शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन
वेळ :- सायंकाळी 6.00 वाजता
स्थळ :- टागोर नगर, रुबी हॉस्पिटल समोर, विक्रोळी (पूर्व)
आज दुपारी 3.15 वाजता खाजगी विमानाने कलीना येथून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना
दुपारी 4.15 वाजता छत्रपती संभाजी नगर विमानतळ येथे आगमन
सायंकाळी 6.45 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंडच्या दिशेने रवाना
सायंकाळी 7 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंड येथे आगमन
रात्री 9 वाजता संभाजी नगर विमान तळाच्या दिशेने रवाना
रात्री 9.15 वाजता मुंबई च्या दिशेने रवाना
बारवी धरणात मार्चअखेर 50 टक्के पाणीसाठा
त्यामुळे यंदा पावसाळ्यापर्यंत कोणतीही पाणीकपात नाही!
जलसंपदा विभागाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा
संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त सभा होत आहे
या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासह आघाडीचे अनेक नेते संबोधित करणार आहेत
संभाजीनगरात नुकताच झालेला राडा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.