Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nag Panchami 2023 : जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी तालुका प्रशासन सज्ज, तहसिलदारांनी नागरिकांना केलं आवाहन

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नागपंचमी जगप्रसिध्द आहे. सोमवारी नागपंचमी असून तिथं तालुका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदारांनी दिली आहे.

Nag Panchami 2023 : जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी तालुका प्रशासन सज्ज, तहसिलदारांनी नागरिकांना केलं आवाहन
nagpachami 32 shiralaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 19, 2023 | 10:56 AM

शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा (sangli shirala) तालुक्यातील नागपंचमी (Nag Panchami 2023) जगप्रसिध्द आहे. त्यामुळे तिथं बाहेर गावावरुन येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे शिराळा तालुक्यातील नागपंचमी उत्सव पाहायला अनेकदा परदेशी नागरिक येतात. शिराळा तालुक्यातील अनेक मंडळ या उत्सवात सहभागी होतात. वाहतूक व्यवस्था, पोलिस प्रशासन, पंचायत समितीचे कर्मचारी उत्सव पार पाडण्यासाठी सज्जं आहेत. या उत्सवात नागाची पूजा (shirala nag panchami news in marathi) केली जाते. ही पूजा पाहण्यासाठी शिराळा तालुक्याच्या आजूबाजूच्या गावातील लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सवासाठी शिराळा तालुका प्रशासन सज्ज

सांगलीच्या शिराळा येथील येणाऱ्या नागपंचमी उत्सवासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासन सज्ज असल्याचे शिराळा तहसीलदार शामल खोत पाटील यांनी सांगितले आहे. शिराळा तालुक्यातील लोकांनी उत्सवात येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे, त्याचबरोबर उत्सवाच्या दरम्यान किंवा उत्सव झाल्यानंतर नागरिकांची काही तक्रार किंवा मदत हवी असल्यास तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार शामल खोत पाटील यांनी केले आहे.

शिराळा तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील लोकं उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात, त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाने नवे नियम आखले आहेत. बाहेर जाणाऱ्या एसटी बसची व्यवस्था एका बाजूला करण्यात आलेली आहे.

हे सुद्धा वाचा

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी पथनाट्याद्वारे प्रबोधन

शिराळा येथे नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिराळा वनविभाग अधिकारी महंतेश भगले यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा-वाळवा तालुक्यातील प्रत्येक गावात या पथनाट्यद्वारे सापा विषयी असणारे महत्त् सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. साप शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे. त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होतो, याविषयी या पथनाट्याद्वारे माहिती सांगितली जात आहे. सापाविषयी शेतकऱ्यांना अधिक माहिती एवढाचं त्यांचा यामागचा उद्देश आहे.

यावेळी शिराळा वनकर्मचारी शहाजी पाटील, गौरव गायकवाड, शिवाजी खोत, दादासो शेटके, बाबजी पाटील इत्यादी वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सांगली सर्प आपले मित्र मंडळचे कलाकार यांनी आपल्या पथनाट्याने प्रत्येक गावात प्रबोधन करत आहेत.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.