अहमदनगर: नगरमध्ये जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. 21 पैकी 17 जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित चार जागांसाठी मतदान होऊ आज मतमोजणी पार पडली. या चार जागांपैकी भाजपला 2 तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या. (Nagar District co operative bank election)
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे मोठ्या फरकाने निवडून आले. निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता लक्ष लागलय ते अध्यक्ष पदाकडे. सध्या महाविकास आघाडीकडे 14 तर भाजपकडे 7 जागा, असे चित्र आहे.
मात्र, अहमदनगर हा ‘सो-धा’ अर्थात सोयरे- धायरे राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अध्यक्षपदी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे किंगमेकर भुमिका पार पाडू शकतात.
सोयरे धायरेच्या राजकारणामुळे विविध पक्षात असलेले नातेसंबंध कर्डीलेंच्या कामी येवू शकतात तर महाविकास आघाडीचे नेते देखील अध्यक्ष पद ताब्यात राहावे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आता अध्यक्षपदी बाजी कोण मारणार ? याकडे सर्वांच लक्ष लागलय.
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतील नगर तालुका सेवा सोसायटीमधून अखेर भाजपचे किंगमेकर नेते शिवाजीराव कार्डिले (Shivajirao Kardile) यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी सत्यभामाबाई बेरड यांना अवघी 15 मते मिळाली. त्यामुळे शिवाजीराव कार्डिले यांनी निर्विवाद विजय मिळवला आहे.
तर दुसरीकडे कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांनी निसटता विजय मिळवला. पिसाळ यांना 37 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मिनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली. पारनेरमधून उदय गुलाबराव शेळके विजयी ठरले. शेळके यांना 99 तर रामदास भोसले यांना अवघी 6 मते मिळाली.
1) आमदार मोनिका राजळे (पाथर्डी)
2) अण्णासाहेब म्हस्के (राहाता)
3) चंद्रशेखर घुले (शेवगाव)
4) राहुल जगताप (श्रीगोंदा)
5) अमोल राळेभात (जामखेड)
6) सीताराम गायकर (अकोले)
7) मंत्री शंकरराव गडाख (नेवासा)
8) अरुण तनपुरे (राहुरी)
9) माधवराव कानवडे (संगमनेर)
10) भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर)
11) अनुराधा नागवडे (श्रीगोंदा)
12) आशा काकासाहेब तापकिर (कर्जत)
13) करण जयंत ससाणे (श्रीरामपूर)
14) आमदार आशुतोष काळे (कोपरगाव)
15) अमित अशोक भांगरे (अकोले)
16) गणपतराव सांगळे (संगमनेर)
17) विवेक कोल्हे (कोपरगाव)
संबंधित बातम्या
अहमदनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीचा धुराळा, शिवाजी कर्डिलेंसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
(Nagar District co operative bank election)