Nagpur Accident : कोणालाही वेगळा न्याय… नागपूर अपघातानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?

रविवारी मध्यरात्री भरधाव वेगाने चाललेल्या ऑडी कारने अनेक वाहनांना धडक दिली. याप्ररकरणी चालकासह दोघांना अटक करण्यात आली. या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे.

Nagpur Accident : कोणालाही वेगळा न्याय... नागपूर अपघातानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ?
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 11:16 AM

राज्यात कार अपघाताचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री नागपूरमध्ये एका भरधाव वेगाने आलेल्या ऑडी कारने शहरात अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोघं जखमी झाले असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑडी कारने हा अपघात झाला, त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे आहे. तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांची कार आणि अन्य कार्सना धडक बसून मोठे नुकसान झाले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता हा अपघात घडला. काचीपुरापासून ते लोकमत चौका दरम्यान ही दुर्घटना घडली. आरोपानुसार अपघातावेळी ऑडी कारचा वेग ताशी 150 किमी होता. आधी कारनं एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका कारला आणि परत एका तिसऱ्या कारला याच ऑडी कारनं धडक दिली. काही मीटर अंतरावर एकच कार 3 वाहनांना धडक देते, यावरुन कारचालकानं प्रमाणाबाहेर मद्य प्राशन केल्याचं बोललं जातंय. जेव्हा कारचा अपघात झाला तेव्हा  चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत हा देखील गाडीत होता. तो गाडीतील मागच्या सीटवर बसला होता अशी माहिती समोर येत आहे.

आता या अपघातावरून राजकारण तापू लागले असून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एफआयरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं, संकेतचं नाव का नाही , गाडीच नंबर का नाही असा सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी टीका केली. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही मुद्यावरून सवाल विचारला आहे. फडणवीस सर्वांशी समान वागणार का, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी – बावनकुळे

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या ऑडी कारची नोंदणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावे संकेत याच्या नावे आहे. याच मुद्यावरून बोलताना बावनकुळे यांनी सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी,असे स्पष्ट केले. ‘ नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी’, अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

दरम्यान याच अपघाताच्या मुद्यावर शिवसेना (उबाठा गट) सुषमा अंधारे यांनीही हल्ला चढवला आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये ही गाडी toe करून आणताना दिसली मात्र गाडीची नंबर प्लेट गायब आहे. हाँ काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता. आज सकाळी त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. नागपूर hit &run केसमधील फिर्यादी जितेंद्र सोनकांबळे यांची सुरक्षितता अतिमहत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची बाब संकेत बावनकुळे आणि त्याचे 3 साथीदार ज्या लाहोरी बारमध्ये मद्यपान करत होते त्या बार आणि आसपासचे CCTV फुटेज तात्काळ हस्तगत करायला हवेत, असे त्यांनी नमूद केले आहे.

तर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या मुद्यावरून आगपाखड केली आहे. “काल भाजपाच्या बड्या नेत्याच्या मुलाने नागपुरात मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत अनेक गाड्यांना ठोकले. मात्र त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई न करता प्रशासन त्याला पाठीशी घालत आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यस्था भाजपाच्या दावणीला बांधलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. “राज्यातील जनतेच्या जीवाची किंमत या सरकारला नाही. केवळ स्वतःच्या नेत्यांना आणि धन दांडग्याना वाचवणारेच हे सरकार आहे. मात्र याची किंमत येणाऱ्या काळात या सरकारला चुकवावी लागेल. आता जनताच या सरकारला उत्तर देईल,” असेही लोंढे यांनी नमूद केले.

एकंदरच या अपघात प्रकरणावरून विरोधक हे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याप्रकरणी आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.