नागपुरात कायद्याचा धाक संपला? एमडी ड्रग आणि विदेशी बनावटीच्या पिस्टलसह दोघांना बेड्या

नागपूरच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आरोपींना एमडी ड्रग आणि विदेशी बनावटीच्या पिस्टलसह अटक केली आहे. | Nagpur Anti Drugs Squad

नागपुरात कायद्याचा धाक संपला? एमडी ड्रग आणि विदेशी बनावटीच्या पिस्टलसह दोघांना बेड्या
Nagpur Anti Drugs Squad
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 1:12 PM

नागपूर :  नागपुरात कायद्याचा धाक संपत चाललाय का?, असा प्रश्न दिवसागणिक विचारला जातोय. अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन आरोपींना एमडी ड्रग आणि विदेशी बनावटीच्या पिस्टलसह अटक केली आहे. आरोपींकडे पिस्टल आणि ड्रग कुठून आलं आणि ते कुणाला देणार होते याचा तपास आता नागपूर पोलिस करत आहे. (Nagpur Anti Drugs Squad Arrest 2 Accussed Who have MD drugs and foreign-made pistols)

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम ड्रग घेऊन फिरत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यावरून सापळा रचून शेख साहिल शेख मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आला त्याची झडती घेतली असता त्याच्या कडे एमडी ड्रॅग आढळून आलं.

त्याच वेळी संतोष सावडिया नावाचा आणखी एक व्यक्ती पोलिसांना संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे सुद्धा ड्रग्ज आणि एक विदेशी बनावटीचे पिस्टल आढळून आले.

पोलिसांनी संतोषची अधिक विचारपूस केली असता त्याने हे पिस्टल मृणाल गजभिये नावाच्या व्यक्तीने दिल असल्याचं सांगितलं. जो जेलमध्ये सजा भोगून लॉकडाऊनच्या काळात बाहेर आला आहे.

दरम्यान, आता पोलीस मृणाल गजभिये याचाही शोध घेत आहे. या प्रकरणात साहिल शेख मोहम्मद या आरोपीकडून 1 ग्राम 14 मिली ड्रग्ज मिळालं आहे तर संतोष सावडिया या आरोपीकडून 14 ग्राम 75 मिली ड्रग आणि एक पिस्टल जप्त करण्यात आलं आहे.

गुजरातमधील व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार, नागपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडला

गुजरातमध्ये व्यापाऱ्याचे अपहरण करुन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून तब्बल 22 लाख रोख आणि इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गुजरातच्या गांधीधाममध्ये एका व्यापाऱ्याचे अपहरण केले होते. या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी मनोज नंदकिशोर हा फरार होता. यानंतर गुजरात पोलिसांना आरोपीबद्दलची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी नागपूर पोलिसांना ही माहिती दिली.

(Nagpur Anti Drugs Squad Arrest 2 Accussed Who have MD drugs and foreign-made pistols)

हे ही वाचा :

आत्महत्या केलेल्या मुलीला पुरुन बेपत्ता असल्याचा कांगावा, आई-वडिलांचा बनाव दहा वर्षांनी उघड

‘क्राईम पेट्रोल’, ‘दृश्यम’चा इफेक्ट, खेळताना पुन्हा पुन्हा ‘राज्य’ आल्यानं मित्राला गाडलं; 13 वर्षीय मुलाला अटक

अवघ्या 400 रुपयांसाठी दोन मित्रांमध्ये हाणामारी, एकाचा मृत्यू, थरार सीसीटीव्हीत कैद

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.