Nagpur Corona | नागपुरात लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरीच क्वारंटाईन करणार, तुकाराम मुंढेंचा निर्णय
लक्षणं नसलेल्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच योग्य सुविधा उपलब्ध असेल. त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आता महापालिकेने कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine) असूनही लक्षणं नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतची माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजाराने ग्रस्त नागरिकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे (COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine).
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत महानगरपालिकेने शहरातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी सूचना काढल्या आहेत.
यापुढे लक्षणं नसलेल्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच योग्य सुविधा उपलब्ध असेल. तर, त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असं मुंढेंनी सांगितलं.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्याने लक्षणं नसल्याबाबत प्रमाणित करणे आवश्यक आहे. रुग्णाच्या घरी त्यांच्या विलगीकरणासह कुटुंबातील व्यक्तींकरिता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधेची उपलब्धता आवश्यक आहे. गंभीर आजाराने ग्रस्त आणि रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही.
60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले वयोगवृद्ध रुग्णांची तसेच इतर आजारी रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासणी केल्यानंतरच त्यांना गृहविलगीकरणाची परवानगी देण्यात येईल, असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
Tukaram Mundhe | नागपूरकरांवर 3 हजार सीसीटीव्हींची नजर, कनेक्शन थेट तुकाराम मुंढेंच्या केबिनमध्ये https://t.co/DPF7UGIuqW #TukaramMundhe #Nagpur @Tukaram_IndIAS
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 27, 2020
COVID-19 Positive Patients Will Be In Home Quarantine
संबंधित बातम्या :
Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
घड्याळावरुन लोकेशन ट्रॅकिंग, सकाळी 6 वाजता धडक, 9 कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढेंचा दणका