Nagpur Corona Update : नागपुरात मृत्यूचं तांडव सुरुच, दिवसभरात मृतांची संख्या शंभरीनजिक!
नागपुरात आज तब्बल 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नागपूर : राज्यातील कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदीसह कठोर निर्बंध लावण्यात आलेत. पण कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यांचं प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. नागपुरात तर गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे. नागपुरात आज तब्बल 98 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत असल्याचं विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (98 people died in a day, while 7,266 new patients in Nagpur)
नागपुरात गेल्या 24 तासांत 7 हजार 229 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 7 हजार 266 जणांची आज कोरोनावर मात केल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या आकडेवारीसह नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 43 हजार 589 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 65 हजार 457 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर नागपुरात आतापर्यंत 6 हजार 575 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपूरला 10 दिवसांत 5 ऑक्सिजन टँकर मिळणार
नागपूरला येत्या 10 दिवसांत 5 ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वय घडवून आणल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ‘नागपूर जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना नागपूरसाठी आगामी 10दिवसात 5ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय करून दिला.(1दिवसाआड एक टँकर) जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांट,सिलतरा,रायपूर येथून हा ऑक्सिजन प्राप्त होणार आहे. या वाहतुकीसाठी ‘जेएसडब्ल्यू‘ मदत करणार आहेत,’ असं फडणवीसांनी ट्वीट करुन सांगितलं.
‘मी जयस्वाल्स निको लि.चे कंपनीचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सह प्रबंध संचालक रमेश जयस्वाल, तसेच जेएसडब्ल्यूचे संदीप गोखले यांचा अतिशय आभारी आहे. आज रामनवमीच्या दिवशी नागपूरकरांसाठी ही अतिशय मोलाची मदत आहे. प्रशासनाने आता त्वरेने कारवाई करावी’, अशी विनंतीही फडणवीसांनी नागपूर प्रशासनाला केलीय.
नागपूर जिल्हाधिकारी यांची भेट घेत त्यांना नागपूरसाठी आगामी 10दिवसात 5ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय करून दिला.(1दिवसाआड एक टँकर) जयस्वाल्स निको लि. या इंटिग्रेटेड स्टील प्लांट,सिलतरा,रायपूर येथून हा ऑक्सिजन प्राप्त होणार आहे.या वाहतुकीसाठी ‘जेएसडब्ल्यू‘ मदत करणार आहे. pic.twitter.com/JNcfpY19kh
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 21, 2021
संबंधित बातम्या :
रेमडेसिव्हीरसाठी तडफडणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी बातमी, वर्धा येथील कंपनी उत्पादन सुरु करणार
98 people died in a day, while 7,266 new patients in Nagpur