Breaking – पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार

पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार...

Breaking - पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार
Follow us
| Updated on: Dec 21, 2022 | 3:58 PM

नागपूर : पिंपरी चिंचवडमधील सर्व अनधिकृत बांधकामं नियमित करणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. शिवाय अनधिकृत बांधकामांना (Pimpri Chinchwad Unauthorized Constructions) लावण्यात येणारा शास्ती करही रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरीतील बांधकाम व्यावसायिकांना हा मोठा दिलासा आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये करवसूलीबाबत सरकारला वेगळा अनुभव आलाय. अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्ती कर भरताना लोक मागे-पुढे पाहतात. त्यामुळे कर भरला जात नाही. त्याचा परिणाम इतर करांवरही होतोय. इतर कर जमा होतानाही अडचणी येत आहेत, असं लक्षात आलं आहे. त्यामुळे शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आतापासून पिंपरी चिंचवडच्या अनधिकृत बांधकामांना हा कर लागू असणार नाही, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शास्तीकराची रक्कम जास्तीची आहे. ही रक्कम मूळ करापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे ही रक्कम भरताना अनेजण टाळाटाळ करतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीलाही मोठा फटका बसतो. त्यामुळे हा शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने सरकारी शाळांबाबत मोठा निर्णय घेतलाय. सरकारी शामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडवणीस यांनी विधिमंडळात बोलताना हा शासन निर्णय सांगितला.

सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रोजेक्ट प्रस्तावित करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली आहे.

विधिमंडळाचं हिवाळी आधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज विधिमंडळात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यात पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांचा मुद्दाही चर्चिला गेला.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.