नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन (Nagpur Lockdown) करण्याची वेळ आली आहे. नागपूरमध्ये 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यातय येत असल्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. नागपुरातच नाही तर ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शनिवार-रविवार बंद म्हणजे मिनी लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नाही. बाधित रुग्ण बाहेर पडत असल्यामुळे लॉकडाऊन करावा लागत आहे, असं नितीन राऊत म्हणाले. (Nagpur District Lockdown news Maharashtra Lockdown imposed till March 21 says Nitin Raut)
नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत (11 मार्च सकाळी 8 वाजता) 1710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असतानाही अनेक जणांच्या वर्तनात सुधारणा दिसत नाही. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणंही वाढलंय. कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 34 हजार 023 वर पोहोचला आहे.
कोरोनाचा चढता आलेख
11 मार्च – 1710 नवे रुग्ण – 8 मृत्यू
10 मार्च – 1433 नवे रुग्ण – 3 मृत्यू
9 मार्च – 1049 नवे रुग्ण – 1 मृत्यू
8 मार्च – 1037 नवे रुग्ण – 7 मृत्यू
7 मार्च – 1037 नवे रुग्ण – 3 मृत्यू
6 मार्च – 904 नवे रुग्ण – 5 मृत्यू
#CoronaAlert: Nagpur city’s status till March 9, midnight.
नागपूर महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची स्थिती. ही आकडेवारी ९ मार्च २०२१ च्या रात्री १२ वाजतापर्यंतची आहे.#NMC #NagpurFightsCorona #WarAgainstVirus pic.twitter.com/JzUQA9szPI
— Nagpur Municipal Corporation (@ngpnmc) March 10, 2021
लॉकडाऊन करण्याची वेळ का आली?
विनामास्क वावर
नागपुरात अनेक जण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरात निम्मे लोक सर्रास विनामास्क वावरतात. भाजीपाला खरेदीसाठी हजारो लोक एकत्र आले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
नागपूर शहरात 14 तारखेपर्यंत मिनी लॉकडाऊन लावण्यात आला. त्यानुसार शनिवार आणि रविवार दोन दिवस बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं, याला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद देत मार्केट बंद ठेवले, मात्र रस्त्यावर बिनकामाचे फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. (Nagpur District Lockdown news Maharashtra Lockdown imposed till March 21 says Nitin Raut)
प्रशासनाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
नागपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. महाशिवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात होणारी गर्दी टाळा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे केलं होतं. उत्सव घरीच साजरा करण्याचं आवाहन करुनही भाविकांनी त्याला हरताळ फासल्याचं दिसलं.
नागपूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात कडक उपाययोजना करून या स्थितीवर मात करण्याचे अधिकार्यांना निर्देश दिले.@CMOMaharashtra @InfoNagpur @INCMaharashtra pic.twitter.com/mo6ERzSi6w
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) March 11, 2021
नागपूरमध्ये काय सुरु काय बंद?
संबंधित बातम्या :
नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध
(Nagpur District Lockdown news Maharashtra Lockdown imposed till March 21 says Nitin Raut)