नागपुरातील मंगल कार्यालयात 8 लोकं कोरोनाग्रस्त, हॉलला पोलिसांनी ठोकलं टाळं, कन्टेन्मेट झोन घोषित

नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला 10 मार्च पर्यंत पोलिसांनी सील केले आहे. | Nagpur maarry hall 8 people Corona positive

नागपुरातील मंगल कार्यालयात 8 लोकं कोरोनाग्रस्त, हॉलला पोलिसांनी ठोकलं टाळं, कन्टेन्मेट झोन घोषित
नागपुरातील हॉलमध्ये 8 लोकांना कोरोना
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 7:51 AM

नागपूर :  संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यातल्या त्यात विदर्भात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. अशातच नागपुरच्या एका मंगल कार्यालयामध्ये एकाच वेळी 8 लोक कोरोनाबाधित मिळाले आहे. एकाचवेळी 8 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने मंगल कार्यालयाला टाळे ठोकले आहेत.

नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन कार्यालयाने कळमना रोड येथील नैवेद्यम इस्टोरिया मंगल कार्यालयाला 10 मार्च पर्यंत पोलिसांनी सील केले आहे. याच मंगल कार्यालयात कोरोनाचे 8 रुग्ण मिळाले होते.

मंगल कार्यालयातील लोकांना कोरोनाची लक्षणे आढळत होती. त्यानंतर त्यांची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. यामध्ये कार्यालयात स्वयंपाक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे एकच धांदल उडाली आहे.

एकाचवेळी 8 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगल कार्यालय सील करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसंच या परिसराला कन्टेनमेंट (विलगीकरण) क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे.

नागपुरात लॉकडाऊन नाही पण कठोर निर्बंध

नागपुरात कोरोनाचा संसर्ग वाढतोय. परंतु तूर्तास लॉकडाऊन केलं जाणार नाही. मात्र कठोर निर्बंध लावले जातील, अशी माहिती नागपुरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. नागपुरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra Minister Nitin Raut On Corona Virus Nagpur Lockdown Updates)

संपूर्ण विदर्भात तसंच नागपूर शहरात कोरोनाचं संक्रमण वाढतं आहे. दिवसेंदिव अधिक संख्येने कोरोना रुग्ण मिळत आहेत. असं असलं तरी सध्या शहरात लॉकडाऊन लावणार नाही मात्र कठोर निर्बंध लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे शहरातील बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरु करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या काळात जास्तीत जास्त ट्रेसिंग करुन तसंच कोरोना चाचण्या करुन साखळी तोडण्याचं काम आरोग्य विभाग करेल, असं ते म्हणाले.

नागपुरात कोणकोणते निर्बंध?

नागपूर शहरात कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे आठवडी बाजार 7 मार्चपर्यंत बंद राहतील तसंच मुख्य बाजार पेठ शनिवार आणि रविवारी बंद राहील.

सर्व शाळा महाविद्यालय तसंच कोचिंग क्लासेस 7 मार्च पर्यंत बंद राहतील. तसंच हॉटेल, रेस्टॉरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील. रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील.

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 7 मार्च पर्यंत बंद राहतील. शहरातील मंगल कार्यालय 25 फेब्रुवारीपासून 7 मार्च पर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी लग्न समारंभ उरकावे लागतील. मंगल कार्यालयमध्ये 7 मार्च पर्यंत लग्न होणार नाही.

नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार. कन्टेन्मेंट झोनमध्ये कठोर निर्बंध लावणार, कोरोनाची संख्या नियंत्रित आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं मंत्री राऊत यांचं आवाहन

(Nagpur maarry hall 8 people Corona positive Administration Announce Contentment zone)

हे ही वाचा :

लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध, नितीन राऊत यांच्या मोठ्या घोषणा

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.