संघर्षानंतर नागपूरचे महापौर-आयुक्त पहिल्यांदाच एकत्र, दोन दिवस जनता कर्फ्यू, 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर

कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला (Tukaram Mundhe on Nagpur Lockdown).

संघर्षानंतर नागपूरचे महापौर-आयुक्त पहिल्यांदाच एकत्र, दोन दिवस जनता कर्फ्यू, 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 2:15 PM

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौरांनी बोलावलेली बैठक संपली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र आले. यावेळी कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला (Tukaram Mundhe on Nagpur Lockdown). तसेच पुढील 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असंही निश्चित करण्यात आलं.

महापौर आणि आयुक्तांनी आज लॉकडाऊनबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. महापौर संदीप जोशी म्हणाले, “बैठकीत सर्व जनप्रतिनिधींचं मत आम्ही जाणून घेतलं. लॉकडाऊन केलं पाहिजे यासाठी कुणाचाही आग्रह नाही. पण नियम पाळले जात नाहीत. त्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचं आहे. उद्या (25 जुलै) आणि परवा (26 जुलै) नागपुरात जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. 27 जुलै ते 30 जुलै या हे 4 दिवसांमध्ये नागपुरात लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरुन लोकांना आवाहन करणार आहेत.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“लॉकडाऊन हा अंतिम निर्णय असू शकत नाही. 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा याबाबत बैठक होणार आहे. 31 जुलैपर्यंत जनतेनं नियम पाळले नाही, तर 31 जुलैच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा होईल,” असंही महापौर संदीप जोशी यांनी नमूद केलं.

आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, “अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकानं उद्या-परवा बंद ठेवावीत. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये. नागरिकांनी नियम पाळले, तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. नियम पाळले नाही, तर लॉकडाऊनची वेळ येईल. तेव्हा कर्फ्यू देखील असेल. लोकांनी किमान आपल्या जीवासाठी तरी नियमांचं पालन करावं.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“उद्या परवाच्या जनता कर्फ्यूत पोलीस नागरिकांना नियम पाळण्याबाबत विनंती करणार आहेत, अशी माहिती नागपूरचे पोलीस सहाय्यक आयुक्तांनी दिली.

हेही वाचा :

कोरोना रुग्ण 20 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं, नागपूरमधील नगराध्यक्षाची मागणी

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात

Tukaram Mundhe on Nagpur Lockdown

अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.