हॉल-लॉनमध्ये नाही, घरीच लग्न लावा, तुकाराम मुढेंकडून ‘विवाहनियम’
लग्न सोहळा हा सभागृह किंवा लॉनमध्ये न करता घरी करा, असे आदेश नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले (Nagpur Tukaram Mundhe On Marriage) आहे.
नागपूर : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लग्न सभारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली आहे. पण लग्न सोहळा हा सभागृह किंवा लॉनमध्ये न करता घरी करा, असे आदेश नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही तुकाराम मुंढेंनी दिला आहे. (Nagpur Tukaram Mundhe On Marriage)
नागपुरात काही हॉल आणि लॉन मालकांनी अटी, शर्थीचं पालन करत सुरक्षित लग्नाच्या पॅकेजबाबत जाहिराती केल्या होत्या. घरी जागेचा अभाव, कोरोनाची भीती आणि पावसाळा असल्यानं अनेकांनी हॉल, लॉन बुक केले होते.
नागपूर महापालिकेने एक परिपत्रक काढून हॉल आणि सभागृहात लग्न करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच लग्न हे घरीच जास्तीत जास्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत करता येणार आहे. विशेष म्हणजे जर घरी लग्नकार्य करताना नियमांचं उल्लंघन झालं, तर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंढेंनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने विवाह सोहळ्यांना काही अटी आणि शर्ती घालून परवानगी दिली आहे. लग्न समारंभात 50 नातेवाईकांना सहभागी होता येईल. ‘लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही’, असं राज्य सरकारकडून नियमावलीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असंही सांगितलं आहे. (Nagpur Tukaram Mundhe On Marriage)
VIDEO : सुपरफास्ट 50 न्यूज https://t.co/oAUCXv2fOn
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 13, 2020
संबंधित बातम्या :
पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल
राज्य सरकारच्या नियमावलीत लग्न आणि अंतिम संस्काराबाबत कोणत्या अटी?